मध्यप्रदेशात ३०० जणांची, तर छत्तीसगडमध्ये ७० कुटुंबांची हिंदु धर्मात घरवापसी !

या हिंदूंना ख्रिस्ती मिशनर्‍यांनी आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर केले होते. नाताळच्या दिवशीच हा कार्यक्रम पार पडला.

आयटीआय विद्यार्थ्यांना ५०० रुपये विद्यावेतन लागू करणार ! – मंगलप्रभात लोढा, मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता

आयटीआय विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढीसंदर्भात तारांकित प्रश्नात सदस्य विक्रम काळे यांनी विचारलेल्या प्रश्नावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही घोषणा केली.

घरामध्ये स्वसंरक्षणासाठी भाजी कापण्याचा तरी चाकू ठेवा ! – खासदार साध्वी प्रज्ञासिंह

‘आपल्या मुलींना वाचवा. त्यांच्यावर योग्य संस्कार करा’, असे आवाहनही त्यांनी या वेळी हिंदूंना केले.

वीजमीटरचे चुकीचे रिडिंग देणार्‍या ७९ एजन्सींवर शासनाकडून कारवाई ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल तालुक्यात महावितरण आस्थापनाकडून अधिक वीजदेयके आकारण्यात येत असल्याचा सभागृहात उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर फडणवीस यांनी ही माहिती दिली.

सिंधुदुर्ग येथील विमानतळाला ‘बॅ. नाथ पै विमानतळ, सिंधुदुर्ग’ नामांतर करण्यास संमती !

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथील विमानतळाला ‘बॅ. नाथ पै विमानतळ, सिंधुदुर्ग’ असे नाव देण्याच्या ठरावास २६ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत संमती देण्यात आली. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याविषयी शासकीय ठराव मांडला होता.

‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन कायदा करणार ! – गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा मंत्री

२५ डिसेंबर या दिवशी शिवतीर्थ मैदान येथे आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेला ते उपस्थित होते. त्या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी हे आश्‍वासन दिले.

खुलताबाद (जिल्हा संभाजीनगर) येथे ‘ट्रॉमा केअर सेंटर’ला मान्यता !

खुलताबाद शहरालगतच असलेल्या सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. खुलताबादसह दौलताबाद, वेरूळ, म्हैसमाळ आणि सुलिभंजन ही पर्यटन अन् धार्मिक स्थळेही आहेत.

देवगिरी सहकारी साखर कारखानाच्या जागेतील गौण खनिजाच्या उत्खननाची विभागीय चौकशी होणार !

संभाजीनगर येथील फुलंब्री तालुक्यातील देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या ८०-१०० एकर भूमीतील लाखो ब्रास मुरुमाचे उत्खनन करून तो समृद्धी महामार्गासाठी वापरण्यात आला; मात्र अद्याप त्याचे पैसे कारखान्याला मिळालेले नाहीत.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी तसूभरही भागे हटणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

कोणत्याही परिस्थितीत आम्ही सीमाबांधवांना वार्‍यावर सोडणार नाही. महाराष्ट्राच्या इंच-इंच जागेसाठी लढू. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आम्ही तसूभरही भागे हटणार नाही, अशी राज्यशासनाची भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २६ डिसेंबर या दिवशी विधानसभेत मांडली.

गायरान भूमी घोटाळा आणि कृषी महोत्सवासाठी अधिकार्‍यांकडून पैसे वसूल केल्याचा आरोप !

अधिकाराचा गैरवापर करून गायरान भूमी एका व्यक्तीला दिल्याप्रकरणी, तसेच सिल्लोड येथील कृषी महोत्सवासाठी अयोग्य पद्धतीने पैसे वसूल केल्याप्रकरणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी, यासाठी २६ डिसेंबर या दिवशी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली.