नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ डिसेंबर या दिवशी दुपारी येथील ध्यानचंद स्टेडियममध्ये होणार्या पहिल्या ‘वीर बाल दिवसा’च्या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या वेळी ३०० लहान मुलांकडून कीर्तन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिखांचे १० वे गुरु श्री गुरु गोविंद सिंह यांच्या ‘प्रकाश पर्व’ दिनानिमित्त ९ जानेवारी २०२२ या दिवशी गुरु गोविंद सिंह यांचे पुत्र बाबा जोरावर सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या हौतात्म्यावरून २६ डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते. या दोघांना मोगलांनी इस्लाम न स्वीकारल्यामुळे भिंतीमध्ये जिवंत बंद करून ठार मारले होते.
(सौजन्य : Gur Prasad Channel)
देशभरात या निमित्त या पुत्रांविषयी नागरिकांमध्ये, लहानमुलांमध्ये माहिती व्हावी; म्हणून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, तसेच रेल्वे स्थानक, पेट्रोल पंप आदी ठिकाणी प्रदर्शन लावण्यात येणार आहे.