संपूर्ण देशासाठी लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा करा ! – कार्तिक साळुंके, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देहली येथील जंतरमंतरवर हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन

हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात सहभागी झालेले धर्मप्रेमी

देहली – गेल्या काही वर्षांपासून हिंदु महिलांच्या विरोधात लव्ह जिहादच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आफताब पूनावाला याने श्रद्धा वालकरची क्रूर हत्या केल्यानंतर जिहादींचे मनोबल वाढले आहे. लव्ह जिहाद ही समस्या केवळ राज्याशी सीमित नसून ती राष्ट्रीय समस्या बनली आहे. त्यामुळे संपूर्ण देशासाठी लव्ह जिहादविरोधी कायदा बनवण्यात यावा. जोपर्यंत असा कायदा करण्यात येत नाही, तोपर्यंत अशी आंदोलने चालूच रहातील, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. कार्तिक साळुंके यांनी केले.

‘लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या विरोधात कठोर कायदा करण्यात यावा’, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील जंतरमंतरवर हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या आंदोलनामध्ये अनेक धर्मप्रेमी उपस्थित होते.