मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विधानसभेत लक्षवेधी सूचनांचा ५५ मिनिटांचा वेळ वाया !

नागपूर, २६ डिसेंबर (वार्ता.) – विधानसभेत सकाळी ९ ते १०.४५ या १ घंटे ४५ मिनिटांच्या लक्षवेधी सूचनांवरील चर्चेच्या सत्रात मंत्री उपलब्ध नसल्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. यामुळे २६ डिसेंबर या दिवशी विधानसभेचा ५५ मिनिटे वेळ वाया गेला. सभागृहाच्या सकाळच्या सत्रात एकूण १३ लक्षवेधी सूचना चर्चेसाठी घेण्यात आल्या होत्या; परंतु मंत्री उपलब्ध नसल्यामुळे केवळ ५ लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली.