‘ऑनलाईन’ तक्रार नोंदवण्यासाठी मासाभरातच पोलीस ‘ॲप’ ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

गोव्याबाहेरील लोक गोव्यात येऊन गुन्हेगारी करतात. नागरिक या ‘ॲप’च्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ तक्रार नोंदवू शकणार आहेत. तक्रारदाराला स्वत:च्या ओळखीचा पुरावा द्यावा लागणार आहे. तक्रारीनंतर पोलीस त्यावर कारवाई करतील.

भारतियांनो, साधनेचे महत्त्व लक्षात घ्या !

‘हल्ली पाश्‍चात्त्य देशांत बहुधा भांडायला हक्काचे कुणी असावे; म्हणून लग्न करतात ! पुढे भांडणाचा कंटाळा आला की, घटस्फोट घेतात. नंतर पुन्हा लग्न करतात आणि पुन्हा घटस्फोट घेतात. असे चक्र चालू रहाते ! आपल्याकडे ही स्थिती होऊ नये; म्हणून साधना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

दुमका (झारखंड) येथे विवाहित हिंदु महिलेची धर्मांध मुसलमानांनी हत्या केल्याचे उघड

येथे यावर्षी ३१ ऑगस्टला झुडपात सापडलेल्या महिलेच्या अर्ध्या जळालेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. मृत विवाहित हिंदु महिलेची मुन्ना मियाँ नावाच्या धर्मांध मुसलमानाने हत्या केल्याचे उघड झाले आहे.

पंजाबमधील भारत-पाक सीमेवर सीमा सुरक्षा दलाने पाडले पाकिस्तानी ड्रोन !

सीमा सुरक्षा दलाने येथील भारत-पाक सीमाभागात एका पाकिस्तानी ड्रोनवर आक्रमण करून ते पाडले. याआधी १४ ऑक्टोबरलाही सुरक्षा दलाने अमृतसर येथे पाकचे ड्रोन पाडले होते. त्या वेळी सैनिकांनी ड्रोन पाडण्यासाठी त्यावर १७ गोळ्या झाडल्या होत्या.

शामली (उत्तरप्रदेश) येथे ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकलेल्या हिंदु तरुणीची आत्महत्या !

येथील समीर अहमद नावाच्या धर्मांध मुसलमानाने कोमल शर्मा या हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून ५ वर्षांपूर्वी तिच्याशी विवाह केला. त्यानंतर तो कोमल यांना सतत त्रास देत होता. यासह त्याने कोमल यांना अनेक वेळा गर्भपातही करायला भाग पाडले.

हिंदु शब्द वैदिक आणि पौराणिक आहे ! – शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती

कर्नाटकातील काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी हिंदु शब्द विदेशी असून त्याचा अर्थ खूपच घाणेरडा आहे, असे म्हटले होते. त्यावर सर्वच स्तरांवरून टीका होत आहे. त्यांनी वेगवेगळा संदर्भही देण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रेखा तौर यांची घोषणा !

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे कपडे फाडणार्‍यास १० लाखांचे पारितोषिक !

‘हर हर महादेव’ चित्रपटाचे प्रदर्शन थांबवल्यास न्यायालयात जाणार !

‘हर हर महादेव’ चित्रपटाचे प्रदर्शन थांबवल्याने मनसेच्या विधी विभागाने येथील ४ मल्टिप्लेक्सला कायदेशीर नोटीस बजावली. ‘प्रदर्शन थांबवल्यास मल्टिप्लेक्सच्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट करू’, अशी चेतावणी मनसेने दिली.

संभाजीनगर येथे ‘हर हर महादेव’ चित्रपट चालू करण्यावरून मनसे-संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांमध्ये वाद !

शहरातील फेम तापडिया चित्रपटगृहात ९ नोव्हेंबर या दिवशी ‘हर हर महादेव’ चित्रपट चालू करण्यावरून मनसे-संभाजी ब्रिगेड संघटनेतील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. मनसेकडून चित्रपट पुन्हा चालू करण्याची मागणी करण्यात आली असून संभाजी ब्रिगेडने याला विरोध केला आहे.