राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रेखा तौर यांची घोषणा !

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे कपडे फाडणार्‍यास १० लाखांचे पारितोषिक !

डावीकडून कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रेखा तौर

संभाजीनगर – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह  भाषेत टीका करणारे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे ‘कपडे फाडा’, असे जाहीर आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने केले आहे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंघटित कामगार विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षा रेखा तौर यांनी सत्तार यांचे कपडे फाडणार्‍यास १० लाख रुपयांचे पारितोषिक देण्याचेही घोषित केले आहे. रेखा तौर म्हणाल्या की, अब्दुल सत्तार यांनी आपल्या बेताल वक्तव्याने केवळ सुप्रिया सुळे यांचाच नव्हे, तर राज्यातील सर्वच महिलांचा अवमान केला आहे.

रेखा तौर म्हणाल्या की, अब्दुल सत्तार म्हणतात की, मी कुणाचे मन दुखावले असेल, तर क्षमा मागतो; पण आम्हाला सत्तार यांची क्षमा नको. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्यांचे त्यागपत्र घ्यावे.