|

शामली (उत्तरप्रदेश) – येथील समीर अहमद नावाच्या धर्मांध मुसलमानाने कोमल शर्मा या हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून ५ वर्षांपूर्वी तिच्याशी विवाह केला. त्यानंतर तो कोमल यांना सतत त्रास देत होता. यासह त्याने कोमल यांना अनेक वेळा गर्भपातही करायला भाग पाडले. काही कालावधीनंतर समीर हा मुसलमान असल्याचे कोमल यांना कळाल्यावर त्यांना मानसिक धक्का बसून त्यांनी ३ मासांपूर्वी आत्महत्या केली. आता कोमल यांच्या वहिनीने ७ नोव्हेंबरला शामलीच्या जिल्हाधिकार्यांना या घटनेची माहिती दिल्यावर हे प्रकरण उजेडात आले.
‘कोमल यांनी प्रत्यक्षात ३ मासांपूर्वीच आत्महत्या केली होती; परंतु स्वत:च्या पतीचा झालेला मृत्यू आणि मूल आजारी असल्याच्या कारणांमुळे घटनेविषयी पोलिसांत सांगायला विलंब झाला’, असे कोमल यांच्या वहिनीने सांगितले.
समीरचा भाऊ आणि आई यांचेही समीरला साहाय्य !
कोमल यांनी आत्महत्येच्या वेळी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, ‘‘समीर अहमद हा माझी अश्लील छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित करण्याची धमकी देत होता, तसेच तो माझ्याकडे सतत पैशांची मागणी करत होता. ‘तुला जनावरांना विकतात, तसे विकून टाकीन’, अशा शब्दांत तो मला धमकावत होता. यामध्ये समीरचा भाऊ आणि आई हेही त्याला साहाय्य करत होते.’’
संपादकीय भूमिकाराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा असला, तरी धर्मांध मुसलमानांना त्याचे काहीच भय नसल्याचेच ही घटना दर्शवते ! यावर आता योगी आदित्यनाथ शासनाने कठोर उपाययोजना काढावी, असेच हिंदुत्वनिष्ठांना वाटते ! |
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !