शेअर मार्केटिंग गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणार्‍या खोट्या आस्थापनांच्या घोटाळ्यांची चौकशी करा !

श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान यांनी शेअर मार्केटिंग गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक करणार्‍या खोट्या आस्थापनांचे घोटाळे बाहेर काढण्यासाठी कंबर कसली आहे. जनतेचा लुबाडलेला पैसा जनतेला परत मिळालाच पाहिजे, अशी आमचीही इच्छा आहे…

संभाजीनगर येथे हानीभरपाईसाठी शेतकर्‍यांचे ‘जलसमाधी’ आंदोलन !

जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शेतकर्‍यांनी हानीभरपाईसाठी ९ नोव्हेंबर या दिवशी येथील जायकवाडी धरणाच्या ‘बॅकवॉटर’मध्ये उतरून ‘जलसमाधी’ आंदोलन केले.

नाशिक येथील आयुर्वेदिक महाविद्यालये अनुमतीच्या प्रतीक्षेत !

भारतीय चिकित्सा पद्धती केंद्रीय आयोगाने (एम्.सी.आय.एस्.एम्.ने) ऐन प्रवेशाच्या कालावधीतच शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयांची पडताळणी करून पुरेसे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सुविधा नसल्याने यंदाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेवर बंदी घातली होती.

कॉन्व्हेंट शाळा, तसेच चर्चप्रणीत अनाथालये येथे अल्पवयीन मुला-मुलींवर लैंगिक अत्याचार करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी !

राज्यातील चर्चप्रणीत अनाथालये, तसेच कॉन्व्हेंट शाळा येथे अल्पवयीन मुली, तसेच विद्यार्थी यांचे लैंगिक शोषण होत आहे. अनेक शहरांत कॉन्व्हेंट शाळा चालवणारे बिशप आणि फादर हे लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करत असल्याच्या अनेक पालकांच्या तक्रारी आहेत.

पहिल्या दिवशी सूर्यकिरणांचा श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणांना स्पर्श !

साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असणार्‍या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या किरणोत्सवास ९ नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला.

‘हर हर महादेव’ चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता यांना नोटीस !

चित्रपटात ऐतिहासिक प्रसंग चुकीच्या पद्धतीने दाखवल्याने वाद !

संजय राऊत यांची अटक अवैध, अद्याप मुख्य आरोपींना अटक का नाही ?

पत्राचाळ घोटाळ्याच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने स्वत:च्या मर्जीनुसार आरोपी निवडले आहेत. या प्रकरणात राकेश आणि सारंग वाधवान हे मुख्य आरोपी असतांना अद्याप त्यांना अटक का करण्यात आलेली नाही ?

आंदोलनाला वैध मार्गाने विरोध करणार्‍या हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांना धक्काबुक्की

येथील शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयासमोर काही महिला अधिवक्त्यांनी ८ नोव्हेंबर या दिवशी पू. संभाजी भिडेगुरुजींच्या विरोधात हातात फलक घेऊन घोषणा देत आंदोलन केले.

संजय राऊत यांना जामीन संमत

गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्वसन घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना जामीन संमत करण्यात आला. ‘पी.एम्.एल्.ए.’ न्यायालयात त्यांच्या जामिनावर सुनावणी चालू होती.

हिंदूंची संपत्ती हडपण्याचे अमर्याद अधिकार मिळालेला ‘वक्फ कायदा’ रहित करा ! – शिरोळ (जिल्हा कोल्हापूर) येथे निवेदन

हिंदूंची संपत्ती हडपण्याचे अमर्याद अधिकार मिळालेला ‘वक्फ कायदा’ रहित करा, या मागणीसाठी शिरोळ येथील तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले. हे निवेदन महसूल अवल कारकून शब्बीर मोमीन यांनी स्वीकारले.