‘हर हर महादेव’ चित्रपटाचे प्रदर्शन थांबवल्यास न्यायालयात जाणार !

नाशिक येथील चित्रपटगृहांना मनसेकडून चेतावणी !

नाशिक – ‘हर हर महादेव’ चित्रपटाचे प्रदर्शन थांबवल्याने मनसेच्या विधी विभागाने येथील ४ मल्टिप्लेक्सला कायदेशीर नोटीस बजावली. ‘प्रदर्शन थांबवल्यास मल्टिप्लेक्सच्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट करू’, अशी चेतावणी मनसेने दिली.

 (सौजन्य : TV9 Marathi)

८ नोव्हेंबरपासून राष्ट्रवादी काँग्रेसने ‘हर हर महादेव’ चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी निवेदन दिले होते, तर मनसेकडून ‘हर हर महादेव’ चित्रपटाचे प्रदर्शन चालू करण्याविषयी चित्रपटगृह मालकांना निवेदन देण्यात आले होते. मनसेच्या मागणीला यश आले असून शहरात २ प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे.