५० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना बाजार समितीचा सचिव पोलिसांच्या कह्यात !

भ्रष्टाचाराने पोखरलेली आणि भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झालेली शासकीय कार्यालये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आहेत, हे लज्जास्पद !

आणखी ५ भूमाफियांना अटक, एकूण आरोपींची संख्या १० !

डोंबिवली येथील ६५ अवैध इमारत प्रकरणांशी संबंधित आणखी ५ भूमाफियांना २३ नोव्हेंबरला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष अन्वेषण पथकाने अटक केली. या भूमाफियांनी सर्वसामान्य नागरिकांना अवैध इमारतीमध्ये घर विकून फसवणूक केली आहे.

कामगार नेते आणि धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांच्या मुलाविरोधात गुन्हा नोंद !

कामगार नेते, तसेच धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांचा मुलगा ऋग्वेद यांनी ३० फूट खोल विहिरीचे अवैध बांधकाम केल्याची तक्रार करण्यात आली होती.

शहरातील पथदिवे बंद असल्यास ‘ऑनलाईन’ तक्रार करा ! – शीतल तेली-उगले, आयुक्त, महापालिका

शहरातील पथदिवे बंद अवस्थेत आढळल्यास नागरिकांनी ‘ऑनलाईन’ तक्रार प्रविष्ट करावी. २४ घंट्यांच्या आत दिवे चालू करण्यात येतील – महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले

असे अभ्यासक्रम सर्वच विद्यापिठांमध्ये हवेत !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या संस्कृत प्राकृत विभागाने अथर्वशीर्ष प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालू केला असून विद्यापिठाने याला मान्यता दिली आहे.

कडवट आहे; पण सत्य आहे !

पळून जाऊन लग्न करायचे असेल, तर मुलींना वेटर, ड्रायव्हर (वाहनचालक), कामगार, मुसलमान सुद्धा चालतो. फक्त ठरवून लग्न करायचे म्हटले की, सरकारी नोकरी, बंगला, फ्लॅट (सदनिका), चारचाकी, शेती या अपेक्षा असतात.

वाहतुकीचे नियम शालेय अभ्यासक्रमात घ्या !

वाहतुकीचे नियम पाळले जावेत, यासाठी शालेय अभ्यासक्रमात याचा समावेश हवा. यामुळे नव्या पिढीवर वाहतुकीचे नियम आणि शिस्त यांचे संस्कार होतील, तसेच प्रत्येकाला आपल्या प्राणाची अन् इतरांच्या प्राणाची किंमत असणेही महत्त्वाचे आहे. हे सर्व प्रबोधन शालेय जीवनातून होणे आवश्यक !

हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र जागृती सभा !

वार आणि दिनांक : रविवार, २७ नोव्हेंबर २०२२, वेळ : सायंकाळी ५
स्थळ : श्री गणेश मंदिर, दातार कॉलनी, भांडुप (पूर्व), मुंबई – ४०००४२

शेतात रासायनिक खते घालणे हे समष्टी पापच !

‘रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचे परिणाम लगेचच दिसून येतात. या परिणामांना शेतकरी भुलतात; मात्र यांचे महाभयंकर दुष्परिणाम लक्षात घेतले जात नाहीत.