शेतात रासायनिक खते घालणे हे समष्टी पापच !

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम

सौ. राघवी कोनेकर

‘रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचे परिणाम लगेचच दिसून येतात. या परिणामांना शेतकरी भुलतात; मात्र यांचे महाभयंकर दुष्परिणाम लक्षात घेतले जात नाहीत. मातीत सतत घातल्या जाणार्‍या ‘यूरिया’सारख्या रासायनिक खतांमुळे, तसेच विषारी कीटकनाशकांमुळे भूमी नापिक होणे, शेतातील विषारी घटक पाण्यात मिसळून पाणी दूषित होणे, जैवविविधतेचा नाश होणे, वातावरणात नको ते पालट होणे, अशा कित्येक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याखेरीज असे अन्न खाऊन मानवी शरिरात अपायकारक विषारी अंश जाण्यासाठी शेतकरीच अप्रत्यक्षपणे उत्तरदायी ठरत आहे. निसर्गाने, म्हणजेच ईश्वराने निर्माण केलेल्या व्यवस्थेमध्ये ढवळाढवळ करण्याचा अधिकार मानवाला नाही. त्यामुळे तात्पुरता व्यावसायिक लाभ न पाहता शेतकर्‍यांनी समष्टीच्या कल्याणासाठी नैसर्गिक शेतीकडे वळणे आवश्यक आहे.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (१०.११.२०२२)