नागपूर येथे पोलिसांनी ट्रकमधून १ कोटी ५ लाखांचा गांजा पकडला !

नागपूर – पोलिसांनी धाड टाकून ओडिशा राज्याच्या ट्रकमधून १ सहस्र ५०० किलोचा साधारण १ कोटी ५ लाख रुपयांचा गांजा पकडला आहे. मादक पदार्थ विरोधी पथकाची ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई मानली जाते. ट्रकमधील माल बीड येथे घेणार असलेल्या दोघांना बीड पोलिसांनी कह्यात घेतले आहे.