हजारीबाग (झारखंड) येथे धर्मांधांनी हिंदु मुलीचे अपहरण

झारखंडमध्ये ‘लव्ह जिहाद’चे नवीन प्रकरण उजेडात !

हजारीबाग (झारखंड) – येथून धर्मांधांनी एका अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलगी बेंगळुरू येथे आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. ‘बलपूर्वक धर्मांतर करून विवाह करण्याच्या उद्देशाने माझ्या मुलीचे अपहरण केले’, असा आरोप मुलीच्या आईने केला आहे.

पीडित मुलीच्या आईने, ‘४ नोव्हेंबर या दिवशी शाहिद अन्सारी आणि अरबाज अन्सारी आमच्या घरात घुसले आणि त्यांनी माझ्या मुलीला दुचाकीवरून पळवले. आरोपी ६मासांपासून माझ्या मुलीला पळवून नेण्याची धमकी देत होता’, अशी तक्रार केली आहे. पोलिसांनी मुलीला बेंगळुरू येथून कह्यात घेतले आहे, अशी माहिती हजारीबागचे पोलीस अधीक्षक मनोज रतन चौथे यांनी दिली आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू असल्याचे त्यांनी सांगितले. हजारीबाग येथील भाजपचे आमदार मनीष जयस्वाल यांनी राज्य सरकारवर तुष्टीकरणाचा आरोप केला आहे.