हुब्बळ्ळी येथे बलपूर्वक धर्मांतराच्या प्रकरणी १५ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद

(प्रतिकात्मक छायाचित्र)

हुब्बळ्ळी (कर्नाटक) – कर्नाटक पोलिसांनी शहरात बलपूर्वक धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी १५ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. ख्रिस्ती धर्मप्रचारक हिंदु धर्मातील शिक्कलगार समुदायाला लक्ष्य करून संपूर्ण समाजाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. लोकांवर हिंदु धर्म सोडून ख्रिस्ती पंथ स्वीकारण्यासाठी दबाव आणण्यासाठी ख्रिस्ती धर्मप्रचारक स्थानिक मदन बुगुडी याचे साहाय्य घेत असल्याचा आरोप आहे. बलपूर्वक धर्मांतर केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी मदन बुगुडी आणि इतर १४ जण यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहे.

संपादकीय भूमिका

ख्रिस्ती धर्मप्रचारकांना कुणाचेही भय राहिले नसल्याने ते हिंदुत्वनिष्ठ असणार्‍या भाजपशासित राज्यातही हिंदूंच्या धर्मांतरासाठी प्रयत्न करत आहेत. अशांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !