पाकव्याप्त काश्मीर परत घ्या !

भारतीय नागरिक आता थेट संरक्षणमंत्र्यांकडे उघडपणे ही मागणी करू लागणे,  हे ते जागृत झाल्याचेच लक्षण आहे ! ही भारतियांसाठी उत्साहाची घटना आहे. आता त्यांनी सरकारवर दबाव आणून सरकारला पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यास भाग पाडले पाहिजे !

चंद्रावर थेट सौर ऊर्जेद्वारे प्राणवायू, वीज आणि इंधन निर्मिती शक्य ! – नासाचा दावा

चंद्रावर मानवाची वस्ती करण्यासाठी योजना बनवण्यात येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर याकडे पाहिले जात आहे.

भ्रष्टाचार ही एक वाईट प्रवृत्ती असून तिच्यापासून दूर रहायला हवे ! – पंतप्रधान मोदी

भ्रष्टाचार ही एक वाईट प्रवृत्ती असून तिच्यापासून सगळ्यांनी दूर रहायला हवे. गेल्या ८ वर्षांत आम्ही ही संपूर्ण व्यवस्था ‘अभाव’ आणि ‘दबाव’ यांपासून स्वतंत्र करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील विज्ञान भवनमध्ये भ्रष्टाचाराविरोधात तक्रार करण्यासाठी केंद्रीय दक्षता आयोगाच्या नव्या संकेतस्थळाचे उद्घाटन करतांना केले.

हरियाणातील मुसलमानबहुल नूंह जिल्ह्याच्या पंचायत निवडणुकीत हिंसाचार !

हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारचा हिंसाचार होऊ नये, असेच हिंदूंना वाटते ! सरकारचा गुन्हेगारांवर धाक असला पाहिजे !

लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी महंमद आरिफची फाशीची शिक्षा कायम !

वर्ष २००० मध्ये देहलीच्या लाल किल्ल्यावर झालेल्या आक्रमणाचे प्रकरण
सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा पुनर्विचार याचिका फेटाळली

न्यायालयांनी ‘मुस्लिम पर्सनल लॉ’च्या संदर्भात निर्णय घेतांना मौलानांवर विश्‍वास ठेवू नये ! – केरळ उच्च न्यायालय

मौलानांनी कायद्याचे शिक्षण घेतलेले नसते. त्यामुळे त्यांना इस्लामी कायदे समजणे कठीण असते. न्यायालयांनी ‘मुस्लिम पर्सनल लॉ’च्या संदर्भात कायद्याच्या प्रकरणी निर्णय घेतांना इस्लामी विद्वान आणि मौलान यांच्यावर विश्‍वास ठेवू नये, असे केरळ उच्च न्यायालयाने एका सुनावणीच्या वेळी सांगितले.

जिहादी आतंकवादावरील ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचे विज्ञापन प्रदर्शित

चित्रपटात ३२ सहस्र हिंदु आणि ख्रिस्ती तरुणींचे धर्मांतर केल्याचे अन् त्यांचे आतंकवादासाठी वापर केल्याचे चित्रण

तेलंगाणामध्ये अश्‍लील गाण्यात हिंदूंच्या मंत्रजपाचा वापर केल्यावरून गायकाच्या विरोधात गुन्हा नोंद !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा विरोधाच परिणाम !
तेलुगु यू ट्यूब चॅनलने गाणे हटवले !

गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबरला विधानसभेसाठी निवडणूक

एकूण १८२ जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत १ डिसेंबरला ८९ जागांसाठी आणि ५ डिसेंबरला ९३ जागांसाठी मतदान होणार आहे.

भगवान श्रीविष्णूच्या स्नानासाठी केरळमधील थिरूवनंतपुरम् विमानतळ ५ घंट्यांसाठी बंद

मंदिराची ही पारंपरिक मिरवणूक येथील धावपट्टीजवळून जाते. या परंपरेसाठी विमानतळ बंद करण्याची ही प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे.