भ्रष्टाचार ही एक वाईट प्रवृत्ती असून तिच्यापासून दूर रहायला हवे ! – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी

नवी देहली – भ्रष्टाचार ही एक वाईट प्रवृत्ती असून तिच्यापासून सगळ्यांनी दूर रहायला हवे. गेल्या ८ वर्षांत आम्ही ही संपूर्ण व्यवस्था ‘अभाव’ आणि ‘दबाव’ यांपासून स्वतंत्र करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील विज्ञान भवनमध्ये भ्रष्टाचाराविरोधात तक्रार करण्यासाठी केंद्रीय दक्षता आयोगाच्या नव्या संकेतस्थळाचे उद्घाटन करतांना केले. ‘विकसित भारतात प्रशासकीय व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार अजिबात चालवून घेतला जायला नको’ असेही मोदी यांनी या वेळी स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, भ्रष्ट लोकांना कोणत्याही प्रकारे सूट मिळता कामा नये. त्यांना कोणतेही राजकीय किंवा सामाजिक संरक्षण मिळता कामा नये. भ्रष्टाचाराला खतपाणी घालणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यासंदर्भातली प्रक्रिया आपण आता निश्‍चित करायला हवी.