थिरूवनंतपुरम (केरळ) – भगवान श्रीविष्णूच्या स्नानासाठी थिरूवनंतपुरम् आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीजवळून ‘अरट्टू’ मिरवणूक जात असल्यामुळे १ नोव्हेंबर या दिवशी हे विमानतळ दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत, म्हणजे ५ घंट्यांसाठी बंद ठेवण्यात आले होते. येथील प्रसिद्ध पद्मानाभ स्वामी मंदिराच्या परंपरेनुसार प्रतिवर्षी दोनदा विमानाच्या उड्डाणाचे वेळापत्रक पालटले जाते.
अंतरराष्ट्रीय हवाई अड्डे पर ‘भगवान विष्णु को स्नान कराने’ के लिए उड़ान सेवाएं 5 घंटे के लिए बंद कर दी गईं #Kerala https://t.co/1PUqiZ2cQf
— Zee News (@ZeeNews) November 2, 2022
मंदिराची ही पारंपरिक मिरवणूक येथील धावपट्टीजवळून जाते. या परंपरेसाठी विमानतळ बंद करण्याची ही प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे. मंदिराच्या परंपरेनुसार मंदिरातील देवतांच्या मूर्ती वर्षातून दोनदा विमानतळाच्या मागे असलेल्या समुद्रात स्थानासाठी नेल्या जातात. वर्ष १९९२ मध्ये विमानतळ बांधण्यापूर्वीही या मार्गावरून मिरवणूक जात होती.