‘द वायर’ वृत्तसंकेतस्थळाचे संस्थापक आणि संपादक यांच्या घरांवर देहली पोलिसांच्या  धाडी

भाजपचे अमित मालवीय यांच्याविषयी खोटे वृत्तांकन केल्याचे प्रकरण

‘द वायर’ चे संस्थापक सिद्धार्थ वरदराजन् आणि संपादक एम्.के. वेणु

नवी देहली – भाजपच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांच्याविषयी खोटे वृत्तांकन करून त्यांना अपकीर्त केल्याच्या प्रकरणी देहली पोलिसांनी ‘द वायर’ या साम्यवादी वृत्तसंकेतस्थळाचे संस्थापक सिद्धार्थ वरदराजन् आणि संपादक एम्.के. वेणु यांच्या घरांवर धाडी घातल्या. पोलिसांनी त्यांच्या घरांतील विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी केली, असे वृत्त ‘ए.एन्.आय.’ या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे.

‘द वायर’ने मालवीय यांना लक्ष्य करतांना त्यांच्याविषयी खोट्या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. यावर अमित मालवीय यांनी २९ ऑक्टोबर २०२२ या दिवशी देहली पोलिसांकडे ‘द वायर’च्या विरोधात फौजदारी तक्रार प्रविष्ट केली होती. यामध्ये त्यांनी ‘द वायर’चे संस्थापक आणि संपादक यांनी बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने त्यांची अपकीर्ती केल्याचा आरोप केला होता.