(म्हणे) ‘मुसलमान श्री लक्ष्मीदेवीची पूजा करत नाहीत; म्हणून ते धनवान नाहीत का ?’

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते अशा प्रकारची विधाने करून हिंदूंचा बुद्धीभेद करतात, तसेच त्यांच्यामुळे अन्य धर्मियांना हिंदु धर्मावर टीका करण्यासाठी आयते कोलीत मिळते !

भारत पुढीलवर्षी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये जाणार नाही !

भारताने पाकिस्तावर राजनैतिक बहिष्कारच घालण्याची आवश्यकता आहे. त्याच्याशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवण्याची आवश्यकता नाही !

बिहारमध्ये सातवीच्या परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिकेमध्ये काश्मीरचा वेगळा देश म्हणून उल्लेख

अशा घटनेकडे मानवी चूक म्हणून दुर्लक्ष न करता हा प्रश्‍नपत्रिका सिद्ध करणार्‍या शिक्षकाची मानसिकता तपासावी, अशी राष्ट्रप्रेमी नागरिकांची अपेक्षा आहे !

अमेरिकेने ३३ कोटी रुपये किमतीच्या ३०७ प्राचीन मूर्ती भारताला परत केल्या !

एवढ्या मूर्तींची चोरी होईपर्यंत भारतातील पुरातत्व विभाग आणि सुरक्षायंत्रणा झोपल्या होत्या का ? भारताच्या प्राचीन मूर्तींच्या संवर्धनासाठी काहीही न करणारा पुरातत्व विभाग विसर्जित करा !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे विवाहित महिलेचे अपहरण करून २ दिवस ५ जणांकडून सामूहिक बलात्कार

या बलात्कार्‍यांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे अपेक्षित आहे !

मल्लिकाकार्जुन खर्गे काँग्रेसचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष !

काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांचा विजय झाला आहे. त्यांना ७ सहस्र ८९७, तर त्यांचे प्रतिस्पर्धी शशी थरूर यांना केवळ १ सहस्र ७२ मते मिळाली. या निवडणुकीत ४०० हून अधिक मते बाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

तेलंगाणामध्ये हिंदु महिलांना परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी ‘मंगळसूत्र’ काढण्यास सांगितले !

अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणारे तेलंगण राष्ट्र समितीचे सरकार ज्या राज्यात सत्तेत असेल, तेथे अशी घटना घडल्यास आश्‍चर्य ते का ? 

स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांच्या ज्योतिष पीठाचे शंकराचार्य म्हणून पट्टाभिषेक करण्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंडमधील ज्योतिष पीठाचे नवे शंकराचार्य म्हणून स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांचा पट्टाभिषेक करण्यावर स्थगिती आणली आहे. याविषयी प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवरून हा आदेश देण्यात आला आहे.

 ‘ओ.आर्.एस्.’चे जनक डॉ. दिलीप महालनोबिस यांचे निधन

प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. दिलीप महालनोबिस यांचे येथील एका खासगी रुग्णालयात १७ ऑक्टोबर या दिवशी निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते उपचार घेत होते. डॉ. दिलीप महालनोबिस यांनी वर्ष १९७१ च्या बांगलादेश युद्धाच्या वेळी ओ.आर्.एस्.चा शोध लावला.

जनतेने नशेला बळी पडू नये, यासाठीचा मूलगामी उपाय !

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या भक्तीची गोडी निर्माण केली असती, तर कुणी दारू अन्‌ सिगारेट यांच्या नशेला बळी पडला नसता !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले