गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे विवाहित महिलेचे अपहरण करून २ दिवस ५ जणांकडून सामूहिक बलात्कार

बलात्कारानंतर शरिरात लोखंडी सळी घालून तिला पोत्यात घालून रस्त्याच्या कडेला फेकून दिले !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथे एका विवाहित महिलेचे अपहरण करून तिच्यावर २ दिवस सामूहिक बलात्कार करण्यात आला. नंतर तिच्या शरिरात लोखंडी सळी घालून हात-पाय बांधून तिला एका पोत्यात टाकून रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आले. या महिलेवर देहलीतील जीटीबी रुग्णालयात उपचार चालू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी शाहरुख, जावेद, ढोला, औरंगजेब उपाख्य झहीर आणि अन्य एक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

ही महिला तिच्या भावाच्या वाढदिवसानिमित्त देहलीत आली होतो. तेथून ती रिक्शाद्वारे घरी जाण्यासाठी रिक्शाची वाटत पहात असतांना एका चारचाकी गाडीतून आलेलल्या काही जणांनी तिला बंदुकीचा धाक दाखवून गाडीत बसवून नेले आणि निर्जन ठिकाणी तिच्यावर २ दिवस सामूहिक बलात्कार केला. हे लोक तिच्या ओळखीचे होते.

संपादकीय भूमिका

या बलात्कार्‍यांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे अपेक्षित आहे !