मल्लिकाकार्जुन खर्गे काँग्रेसचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष !

मल्लिकाकार्जुन खर्गे

नवी देहली – काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांचा विजय झाला आहे. त्यांना ७ सहस्र ८९७, तर त्यांचे प्रतिस्पर्धी शशी थरूर यांना केवळ १ सहस्र ७२ मते मिळाली. या निवडणुकीत ४०० हून अधिक मते बाद झाल्याची माहिती समोर आली आहे. निकाल घोषित झाल्यानंतर शशी थरूर यांनी ट्वीट करून खर्गे यांचे आभार मानले आहेत. २४ वर्षांनंतर गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती अध्यक्ष म्हणून लाभली आहे. याआधी सीताराम केसरी हे वर्ष १९९६ ते १९९८ या काळात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले होते. त्यांच्यानंतर सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदाचे दायित्व स्वीकारले होते.

माझ्या भूमिकेविषयी खर्गे निर्णय घेतील !  – राहुल गांधी

डावीकडून राहुल गांधी

मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे अध्यक्ष बनल्यानंतर ‘पक्षात तुमची भूमिका काय असणार ?’, याविषयी राहुल गांधी यांना विचारले असता ते म्हणाले की, काँग्रेसच्या अध्यक्षांनी काय निर्णय घ्यावा, यावर मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही. माझी काय भूमिका असेल, यावर मल्लिकार्जुन खर्गे निर्णय घेतील.