स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांच्या ज्योतिष पीठाचे शंकराचार्य म्हणून पट्टाभिषेक करण्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

(पट्टाभिषेक – पदावर बसवण्याचा विशिष्ट विधी)

डावीकडून स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंडमधील ज्योतिष पीठाचे नवे शंकराचार्य म्हणून स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांचा पट्टाभिषेक करण्यावर स्थगिती आणली आहे. याविषयी प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवरून हा आदेश देण्यात आला आहे.

१. याचिकेत म्हटले आहे, ‘स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांनी दिवंगत शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्याकडून ज्योतिष पीठाचे उत्तराधिकारी म्हणून नियुक्त करण्याचा आल्याचा खोटा दावा करण्यात आला आहे.’ या संदर्भात काही कागदपत्रेही न्यायालयात सादर करण्यात आली आहेत.

. यासंदर्भात पुरी येथील गोवर्धन पीठाच्या शंकराचार्यांकडून एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते. यात म्हटले होते की, स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांना ज्योतिष पीठाचे नवे शंकराचार्य म्हणून नियुक्त करण्याचे आम्ही समर्थन केलेले नाही.