भाजप आणि शिंदे गटाने लोकशाहीचा गळा घोटला ! – अरविंद सावंत, खासदार

भाजप आणि शिंदे गटाने लोकशाहीचा गळा घोटला आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी वाशी येथे केले. शिवसेना प्रबोधन यात्रेनिमित्ताने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहातील शिवसैनिकांच्या मोळाव्यात ते बोलत होते.

‘गायीला राष्ट्रीय पशू घोषित करा’ या मागणीसाठी विश्व हिंदु परिषदेची स्वाक्षरी मोहीम !

गायीला राष्ट्रीय पशू घोषित करा, गोमातेला राष्ट्रमाता घोषित करा, संपूर्ण देशभरात एकच गोहत्या बंदी कायदा कठोरपणे लागू करा, महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा अधिकाधिक कठोर करा, गोरक्षकांच्या संरक्षणासाठी आणि गोहत्याबंदी कायद्याची कार्यवाही होण्यासाठी…

पुणे येथे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पथदिव्यांची थकित वीजदेयके भरा !

कोट्यवधी रुपयांची देयके थकित का रहातात ? थकित वीजदेयके भरण्यासाठी आदेश का द्यावे लागतात ? ती वेळोवेळी का भरली जात नाहीत ? हेही पहायला हवे !

राज्य परिवहन मंडळाच्या बसगाड्यांच्या तिकिटाचे दर दिवाळीपुरते वाढणार !

राज्य परिवहन मंडळाच्या बसगाड्यांच्या तिकिटाचे दर दिवाळीच्या सुट्ट्यांपुरते १० टक्क्यांनी वाढणार आहेत. ही हंगामी भाडेवाढ २० ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होईल.

अतीवृष्टीमुळे हानी झालेल्या शेतकर्‍यांना एकूण ७५५ कोटी रुपयांचे साहाय्य !

राज्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतीवृष्टीमुळे पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झालेल्या शेतकर्‍यांना आर्थिक साहाय्य करण्यासाठी एकूण ७५५ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. ३ हेक्टरपर्यंतच्या हानीसाठी प्रत्येक हेक्टरी १३ ते ३६ सहस्र रुपये देण्यात येतील.

मुंबईत ६ मासांत १० सहस्रांहून अधिक बेवारस चारचाकी आढळल्या !

बेवारस वाहनांमध्ये सर्वाधिक १ सहस्र वाहने ग्रँटरोड परिसरातील आहेत. वांद्रे आणि खार येथे ७०८, कुर्ला ७९५, भायखळा ६७३, वडाळा आणि माटुंगा येथून ६११ गाड्या कह्यात घेण्यात आल्या.

बड्या थकबाकीदारांची कर्जवसुली नाममात्रच ! – विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

बड्या कर्जदारांची नावे घोषित करण्यास ‘कॅनरा बँके’चा नकार !

महाराष्ट्रातही समान नागरी कायदा येईल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

गोवा आणि उत्तराखंड येथे समान नागरी कायदा आहे. महाराष्ट्रातही समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रत्येक राज्य तसा प्रयत्न करेल. तो आला पाहिजे आणि येईल. राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये तसे आहे, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. 

मुंबईच्या सुशोभिकरण प्रकल्पाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मान्यता !

मुंबई सुशोभिकरण प्रकल्प आराखड्याला मुख्यमंत्र्यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. सुशोभिकरण प्रकल्पाच्या अंतर्गत रस्ते, पूल, पदपथ, वाहतूक बेटे, समुद्रकिनारे, उद्याने इत्यादी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, सुधारणा आणि आकर्षक प्रकाशयोजना या प्रमुख पालटांसह एकूण १६ विविध प्रकारची कामे केली जाणार आहेत.

यशस्वी परराष्ट्रनीतीचे शिलेदार !

‘भारताने आपल्याला साहाय्य करावे, अशा याचकाच्या भूमिकेत अनेक राष्ट्रे असणे’, ही भारतासाठी अभिमानास्पद गोष्ट ! भारताची युद्धसज्जता, शस्त्रांविषयीचे करार, मैत्रीपूर्ण ठरणारे विदेश दौरे, आंतरराष्ट्रीय हितसंबंध, शत्रूंविरोधात केलेले ‘स्ट्राईक’ हे सर्व पहाता भारत जगातील ‘सर्वाेच्च महासत्ता’ होण्याच्या दिशेकडे मार्गक्रमण करत आहे, हे नक्की !