नवी मुंबई, १४ ऑक्टोबर (वार्ता.) – भाजप आणि शिंदे गटाने लोकशाहीचा गळा घोटला आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी वाशी येथे केले. शिवसेना प्रबोधन यात्रेनिमित्ताने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहातील शिवसैनिकांच्या मोळाव्यात ते बोलत होते.
अरविंद सावंत पुढे म्हणाले की, शिवसेनेने मागणी केलेली चिन्ह निवडणूक आयोगाने गुपित ठेवणे आवश्यक होते; मात्र गोंधळ वााढवण्यासाठी ती उघड करण्यात आली. गद्दार उठसूठ पक्षप्रमुखांवर आरोप करीत आहेत; मात्र त्यांनी हे लक्षात ठेवावे पक्षप्रमुखांनी संयम राखला आहे, म्हणून महाराष्ट्र शांत आहे, नाहीतर तुमची पळताभुई थोडी झाली असती.