सरकारचा आदेश
पुणे – जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या पथदिव्यांचे थकलेले वीजदेयक भरण्याचा आदेश सरकारने दिला आहे. जिल्ह्यातील पथदिव्यांची २६३ कोटी ७४ लाख रुपयांची थकबाकी असून त्यापैकी ५१ कोटी रुपयांची रक्कम समायोजनासाठी सरकारकडून देण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषद प्रशासनाने सांगितले आहे. जिल्हा परिषदेच्या पथदिव्यांची थकित वीजदेयकाची रक्कम महावितरणकडून सरकारने घेतली आहे. थकित रकमेसंदर्भात महावितरणकडून तालुकानिहाय आकडेवारी प्राप्त केली जाईल. त्यानंतर सरकारकडे प्रस्ताव पाठवला जाईल. संबंधित ग्रामपंचायतींनाही रक्कम भरण्याच्या सूचना देण्यात येतील, असे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकाकोट्यवधी रुपयांची देयके थकित का रहातात ? थकित वीजदेयके भरण्यासाठी आदेश का द्यावे लागतात ? ती वेळोवेळी का भरली जात नाहीत ? हेही पहायला हवे ! |