‘गायीला राष्ट्रीय पशू घोषित करा’ या मागणीसाठी विश्व हिंदु परिषदेची स्वाक्षरी मोहीम !

विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्या वतीने  स्वाक्षरी मोहीम

सोलापूर, १४ ऑक्टोबर (वार्ता.) – गायीला राष्ट्रीय पशू घोषित करा, गोमातेला राष्ट्रमाता घोषित करा, संपूर्ण देशभरात एकच गोहत्या बंदी कायदा कठोरपणे लागू करा, महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा अधिकाधिक कठोर करा, गोरक्षकांच्या संरक्षणासाठी आणि गोहत्याबंदी कायद्याची कार्यवाही होण्यासाठी विशेष पोलीस पथक नेमण्यात यावे, अशा विविध विषयांच्या मागणीसाठी विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्या वतीने  स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या मागण्यांचे निवेदन राज्य आणि केंद्र शासन यांच्याकडे देण्यात येणार आहे.

विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या गोरक्षा विभागाकडून राबवण्यात आलेल्या या मोहिमेत पायी चालत जाणार्‍या देवी भक्तांच्या स्वाक्षर्‍या घेण्यात आल्या. या मोहिमेचे भाविकांमधून कौतुक करण्यात आले. आद्यगोरक्षक छत्रपती

श्री शिवाजी महाराज यांनी वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी गायीवर वार करण्यापूर्वीच कसायाचा हात तलवारीने कापला, या इतिहासाचे स्मरण करून देत प्रत्येकाने गोरक्षणाचे कार्य आणि गोसेवेचे कार्य करावे, तसेच स्वत:चा वाढदिवस गोशाळेत साजरा करावा, अशी विनंती केली.

उपक्रम यशस्वी करणारे कार्यकर्ते

हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धर्मजागरण प्रमुख अंबादास गोरंटला, विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दलाचे जिल्हा मंत्री संजय जमादार, शहर संयोजक नागेश बंडी, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल गोरक्षा विभाग प्रमुख प्रतिक्षित परदेशी, सेवाविभाग सहप्रमुख शितलकुमार परदेशी, महाराष्ट्र राज्याचे मानद पशूकल्याण अधिकारी गोरक्षक प्रशांत परदेशी, सतीश सिरसिल्ला, पवनकुमार कोमटी, किरण पंगुडवाले, शुभम साठे यांच्यासह अन्य गोरक्षकांनी परिश्रम घेतले.

संपादकीय भूमिका

गोरक्षकांना मारहाण करणार्‍या पोलिसांचे गोतस्करांशी आर्थिक संबंध आहेत, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ?