पसार झालेल्या एका आरोपीची माहिती देण्यासाठी ‘एन्.आय.ए.’ने घोषित केले २ लाखांचे पारितोषिक !

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील ‘मास्टरमाईंड’ इरफान शेख हा मौलवी मुश्फिक अहमद याला आदर्श मानतो. नुपूर शर्मा यांचे समर्थन करणारी पोस्ट पुढे पाठवल्याने मुश्फिक याच्या सांगण्यावरून अमरावतीच्या कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती.

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा सिद्ध करण्यासाठी सर्वंकष विचार घेणार !

श्री क्षेत्र देहू, आळंदी, भंडारा डोंगर, पंढरपूर पालखी तळ आणि मार्ग विकास आराखड्याच्या अंतर्गत पंढरपूर अन् पालखी मार्ग यांवर भाविकांना पायाभूत सुविधा देण्याच्या अनुषंगाने नव्याने समाविष्ट करायच्या कामांचा आराखडा सिद्ध करण्यात येत आहे.

पुणेकरांच्या कराचा वाया गेलेला पैसा आयुक्तांच्या आणि अन्य अधिकार्‍यांच्या खिशातून वसूल करावा ! – विवेक वेलणकर, ‘सजग नागरिक मंचा’चे अध्यक्ष

गणेशोत्सवासाठी लोखंडी टाक्यांपासून मूर्ती संकलनापर्यंत सर्व नियमित गणेशमूर्तीच्या विसर्जनाचे पर्याय उपलब्ध होते; मात्र त्यानंतरही आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी गणेशोत्सवाच्या कालावधीत १५० फिरते हौद भाडेकराराने घेण्याचा निर्णय घेतला होता…

गडचिरोलीत पावसामुळे हाहा:कार !

जिल्ह्यात गेल्या २४ घंट्यांत ८६.६ मि.मी. पावसाची नोंद झाली असून त्यामुळे अनेक मार्ग बंद झाले आहेत. दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, सिरोंचा आणि अहेरी तालुक्यांतील अनुमाने १०० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.

हिंदु धर्माच्या रक्षणासाठी राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश हवा ! – जगद्गुरु स्वामी राम राजेश्‍वराचार्य, समर्थ माऊली सरकार, पीठाधिश्‍वर, रुक्मिणी विदर्भ पीठ, कौंडण्यपूर, अमरावती

अमरावती येथील खासदार सौ. नवनीत राणा यांनी कार्यक्रमस्थळी लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. या वेळी त्यांना हिंदु जनजागृती समितीपुरस्कृत ‘लव्ह जिहाद’ हा ग्रंथ भेट देण्यात आला.

गैरब्राह्मण पुजार्‍यांची मागणी !

पिढ्यान्पिढ्या काटेकोर धर्माचरण केलेले, अभक्ष भक्षण न करणारे, सात्त्विक आहार-विहाराचे पालन करणारे, कर्मकांडातील बारकावे जाणणारे आणि त्याचे पालन करणारे अन् करवून घेणारे आणि मुख्य म्हणजे धर्माचरण अन् साधना करणारे पुजारी मंदिरात असणे अपेक्षित आहे.

धर्माभिमान जागृत करूया !

हिंदूंनी साधना आणि धर्माचरण केल्यासच त्यांना सण-उत्सव कसे साजरे करावेत ? हे लक्षात येईल आणि त्यांच्यातील धर्माभिमान जागृत झाल्यास अशा प्रकारे चुकीच्या कृती त्यांच्याकडून होणार नाहीत.

५ सहस्र रुपये देऊनही केसांना व्यवस्थित रंग न लावल्याने महिलेची धर्मांधाला मारहाण ! 

५ सहस्र रुपये घेऊनही केसांना व्यवस्थित रंग लावला नाही. त्यामुळे केस काळे होण्याऐवजी पांढरे झाले, असा आरोप करत येथील वर्षा काळे या महिलेने केशकर्तनालय चालक महमंद साजिद सलमान याला मारहाण केली.

गांधी परिवाराने केलेला क्रांतीकारांचा अवमान जाणा !

थिरूवनंतपूरम्मध्ये केरळच्या के.ई. मेमन आणि पद्मश्री पी. गोपीनाथन् नायर या दोन क्रांतीकारकांच्या स्मारकाचे अनावरण करण्यासाठी निमंत्रण देऊनही काँग्रेसचे नेते राहुल गांधी अनुपस्थित राहिले. त्यामुळे केरळ प्रदेशाध्यक्ष सुधाकरन् यांना क्षमा मागावी लागली.

इंग्रजी भाषेचा मोह सोडून राजभाषा हिंदी आणि सर्व भारतीय भाषा यांना समृद्ध बनवण्याचा प्रण करूया !

अनेक देशांमध्ये इंग्रजी भाषेला गौण स्थान असून स्थानिक मातृभाषेतूनच सर्वांगीण विकास होऊन त्यांची प्रगती झाल्याचे दिसून येते. त्यामुळे भारतानेही इंग्रजी भाषेचा मोह सोडून मातृभाषेसह राजभाषा हिंदीचा वापर करणे आवश्यक आहे.