गडचिरोलीत पावसामुळे हाहा:कार !

गडचिरोली – जिल्ह्यात गेल्या २४ घंट्यांत ८६.६ मि.मी. पावसाची नोंद झाली असून त्यामुळे अनेक मार्ग बंद झाले आहेत. दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, सिरोंचा आणि अहेरी तालुक्यांतील अनुमाने १०० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. गडचिरोली सीमेलगत छत्तीसगड राज्यातील जगदलपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडला.