श्री गणेशमूर्ती दान करण्याचे, तसेच फिरत्या हौदात विसर्जन करण्याचे पुणे महापालिकेचे आवाहन !

नैसर्गिक जलस्रोतात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करू नये, असे आवाहन करतांनाच महापालिकेने केवळ शाडू मातीच्या श्री गणेशमूर्तींचे घरच्या घरी विसर्जन करावे, तसेच ‘पीओपी’च्या मूर्तींचे फिरत्या हौदात विसर्जन करावे किंवा मूर्तीदान करावे, असे सांगितले आहे

मुंबई आणि नवी मुंबईत कृत्रिम तलावापेक्षा पारंपरिक विसर्जनाला भाविकांची पसंती !

२ सप्टेंबरला पहाटे ६ वाजेपर्यंत दीड दिवसाच्या ६० सहस्र श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

राज्यभरात हलालविरोधी कृती समिती स्थापन करून ‘हलाल सक्ती’ला विरोध करणार ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक

नागपूर येथे हलालविरोधी कृती समिती स्थापन करण्याचा निर्धार !

पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जनास बंदी !

मूर्ती विसर्जनाचे धर्मशास्त्र पाळण्यास प्रशासनाकडून भाविकांना होणारा प्रतिबंध, हा हिंदूंवरील अन्यायच आहे !

चोर कि पोलीस ?

पोलिसांनी स्वत:च्या वर्दीची ताकद ओळखून कर्तव्यनिष्ठ व्हायला हवे. राजकारण्यांचा मिंधेपणा करण्याऐवजी तत्त्वनिष्ठ व्हायला हवे. राजकर्त्यांनी पोलिसांचा उपयोग राजकीय स्वार्थासाठी करण्याऐवजी समाजहितासाठी करायला हवा. यातूनच पोलिसांची गमावलेली विश्वासार्हता सुधारता येईल !

संभाजीनगर शहरातील पोलीस ठाणे उडवण्याची धमकी देणार्‍यास अटक !

शहरातील एक पोलीस ठाणे उडवण्याची धमकी देणारा तरुण शुभम काळे (वय २३ वर्षे) याला गुन्हे शाखेच्या पथकाने मुकुंदवाडी परिसरातून १ सप्टेंबर या दिवशी अटक केली.

आता ख्रिस्त्यांकडूनही हिंदूंच्या देवतांचा अवमान !

मध्यप्रदेशच्या जनसंपर्क विभागाच्या सामाजिक माध्यमाच्या ऑस्टिन थॉमस या कर्मचार्‍याने श्री गणेशाचा अवमान केला आहे.

व्यायाम कधी करावा ?

जेवण झाल्यावर पोट हलके होईपर्यंत, म्हणजे साधारण ३ घंट्यांपर्यंत व्यायाम करू नये. व्यायामानंतर न्यूनतम १५ मिनिटांपर्यंत काही खाऊ-पिऊ नये.’ – वैद्य मेघराज माधव पराडकर

चीन सरकारच्या विरोधात बोलणार्‍यांवर केले जाणारे क्रूर अत्याचार !

धूर्त नि शक्तीशाली चीनचा अत्याचारी चेहरा जगासमोर आणून त्याला नामोहरम करण्यासाठी भारताने कंबर कसणे आवश्यक !

‘हिंदुद्वेष्टा’ पुरातत्व विभाग !

संतप्त ग्रामस्थांनी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे. हिंदूंच्या सहिष्णु वृत्तीचा अपलाभ घेण्याचा पुरातत्व विभागाने प्रयत्न करू नये. याउलट सर्वांना समान नियम लावून त्यानुसार कार्यवाही करण्याची तत्परता दाखवावी, हीच अपेक्षा !