पुणे – नैसर्गिक जलस्रोतात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करू नये, असे आवाहन करतांनाच महापालिकेने केवळ शाडू मातीच्या श्री गणेशमूर्तींचे घरच्या घरी विसर्जन करावे, तसेच ‘पीओपी’च्या मूर्तींचे फिरत्या हौदात विसर्जन करावे किंवा मूर्तीदान करावे, असे सांगितले आहे; परंतु ‘पीओपी’च्या मूर्ती शाडू मातीपेक्षा स्वस्त असल्याने आणि त्यांची निर्मिती पूर्वीपासून बाजारात होत असल्याने या मूर्तींचीच अधिक विक्री यंदा झाली आहे. त्यामुळे ज्या भविकांकडे ‘पीओपीं’च्या मूर्ती असतील त्यांना या मूर्ती दान देणे किंवा प्रशासनाने व्यवस्था केलेल्या हौदांमध्येच विसर्जन कराव्या लागणार आहेत. (फिरत्या हौदांसारख्या अशास्त्रीय गोष्टींवर व्यय करण्यापेक्षा महापालिकेने भक्तांना वहात्या पाण्यात मूर्ती विसर्जन करण्यास प्रोत्साहन दिल्यास श्री गणेशाची होणारी विटंबना रोखता येईल. – संपादक)