भाविकांचा मात्र वहात्या पाण्यात विसर्जन करण्याकडे कल
पुणे – दीड दिवसांच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी भाविक घाटावर गेले असता त्यांना नदीत विधीवत् विसर्जन करायचे होते; परंतु महापालिकेने बहुतांश सर्वच घाट लाकडी आणि लोखंडी संरक्षक कठडे (बॅरिकेड्स) लावून बंद केल्याने अडचण निर्माण झाली. तेथे नियंत्रणासाठी असणार्या व्यक्ती भाविकांना नदीत मूर्ती विसर्जन करण्यास मज्जाव करत होत्या. तरीसुद्धा भाविकांनी त्यांना डावलून नदीत विसर्जन करण्याचा पर्याय निवडला. ‘दान घेतलेल्या मूर्तींचे काय करता, ते दिसतेच ना ?’, असे भाविक त्यांना विचारत होते. नदीमध्ये साठलेला कचरा, गाळ आणि माती महापालिकेने काढलेली नसल्यामुळेच नागरिकांना पाण्यात विसर्जन करू दिले नाही. एस्.एम्. जोशी पुलाजवळील घाट, ओंकारेश्वर घाट या ठिकाणी भाविकांना नदीत विसर्जन करायचे असूनही ‘बॅरिकेड्स’ लावल्याने भाविक ते ओलांडून नदीत विसर्जन करत असल्याचे दिसून आले. चिंचवड येथील मोरया घाट, ‘बिर्ला हॉस्पिटल’ जवळील थेरगाव घाट, वाल्हेकर वाडी येथील घाट येथे पाणी सोडण्यात आले होते. वाल्हेकर वाडी व्यतिरिक्त अन्य ठिकाणी अग्नीशमनदलाचे कर्मचारी दिसले नाहीत, तसेच कोठेही होडीच्या माध्यमातून विसर्जन व्यवस्था केली नव्हती. केवळ मोरया घाट, चिंचवड येथे ही सुविधा होती; मात्र चिंचवडमध्येही नदीत विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आला. ‘एनव्हायरमेंटल काँझर्वेशन असोसिएशन’च्या कार्यकर्त्यांनी मोरया घाट, चिंचवड येथे भाविकांना विरोध करूनही त्यांनी नदीत विसर्जन केले.
संपादकीय भूमिका
|