हनुमानगड (राजस्थान) येथे बकरी ईदच्या दिवशी गोहत्या झाल्याने हिंदूंकडून आंदोलन

आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, बकरी ईदच्या दिवशी गोहत्या झाली; मात्र प्रशासन ते नाकारत आहे. गोहत्येमधील मांस सापडले होते.

‘मी द्रौपदी मुर्मू यांना चुकून ‘राष्ट्रपत्नी’ म्हटले !’

देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीविषयी उघडपणे अशलाघ्य विधान करणारे नेते सर्वसमान्य नागरिकांशी कसे वागत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! असे खासदार असणे जनतेला लज्जास्पद !

लोकसभेत सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी !

अधीर रंजन चौधरी यांनी केलेल्या विधानानंतर भाजपच्या खासदारांनी लोकसभेत निषेध करत घोषणा दिल्या आणि सोनिया गांधी यांच्या त्यागपत्राची मागणी केली.

इस्लामी विचारसरणी इतरांवर वर्चस्व गाजवण्यावर विश्‍वास ठेवते ! – गीर्ट विल्डर्स, खासदार, नेदरलँड्स

इस्लामला तुमच्याविषयी आदर नाही. इस्लामी विचारसरणी एकत्रित नांदण्यावर विश्‍वास ठेवत नाही; उलट एखाद्यावर वर्चस्व गाजवणे किंवा त्याला अधीन ठेवणे यांवर विश्‍वास ठेवते. हिंदूंनो, हे सत्य मान्य करा आणि तुमचे स्वातंत्र्य आणि हिंदु धर्म यांचे रक्षण करा !

झारखंड येथील एका न्यायाधिशांची हत्या करणारे २ जण दोषी !

हत्या करणार्‍यांना शिक्षा मिळणार असली, तरी त्यामागील अदृश्य हातांवर कारवाई न होणे दुर्दैवी !

मराठीत बोलणे, हा सहस्रावधी मराठी लोकांच्या नोकरीचा प्रश्‍न आहे ! – सचिन खेडेकर, ज्येष्ठ अभिनेते

‘मार्केटिंग’वाल्यांशी बोलतांना त्यांनी हिंदी किंवा इंग्रजी भाषेतून बोलायला प्रारंभ केल्यास तुम्ही मराठीतच बोला. मराठीचा आग्रह धरा; कारण आपल्यामुळे मराठी माणसाला नोकरी किंवा व्यवसाय मिळेल. मग आपोआपच मराठी पाऊल पुढे पडेल.’’

पोलिसांनी दक्षिण भारतातील ३ मठांवरील आतंकवादी आक्रमणाचा कट उधळला !

‘आतंकवादाला धर्म आणि रंग नसतो’, अशी ओरड करत जिहाद्यांची पाठराखण करणार्‍यांना आता काय म्हणायचे आहे ?

देहली येथे एका चपातीसाठी फिरोज खान याच्याकडून हिंदु रिक्शाचालकाची हत्या  

भिखारी असणार्‍या धर्मांधाकडे खायला काही नव्हते; मात्र शस्त्र होते, हे लक्षात घ्या ! अशांच्या आक्रमणांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या !

इराकमध्ये संसदेत घुसून सहस्रो आंदोलकांचा गोंधळ

इराकमध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून इराण समर्थक व्यक्तीचे नाव घोषित केल्याच्या विरोधात आंदोलन चालू झाले आहे. सहस्रो आंदोलकांनी २७ जुलैच्या रात्री इराकच्या संसदेत घुसून इराकी झेंडे फडकवत गोंधळ घातला.

आझमगडच्या कारागृहात बंदीवानांना भ्रमणभाष संच आणि गांजा पुरवला : कारागृह अधीक्षकांसह ४ जण निलंबित

अशा भ्रष्टाचार्‍यांना कामावरून काढून टाकून त्यांना याच कारागृहात शिक्षा भोगायला टाकले पाहिजे ! अशांमुळेच गुन्हेगारांना शिक्षा ही ‘शिक्षा’ वाटत नाही ! अशी स्थिती उणे-अधिक प्रमाणात देशातील जवळपास सर्वच कारागृहांमध्ये असणार, यात शंका नाही !