देहली येथे एका चपातीसाठी फिरोज खान याच्याकडून हिंदु रिक्शाचालकाची हत्या  

मध्यभागी आरोपी फिरोज खान

नवी देहली – येथील करोल बागमध्ये फिरोज खान उपाख्य मन्नू याने रिक्शाचालक मुन्ना (वय ४० वर्षे) याची पोटात चाकू खुपसून हत्या केली. पोलिसांनी फिरोज याला अटक केली आहे.

प्रत्यक्षदर्शी लाखन याने सांगितले की, मी आणि मुन्ना मित्र असून आम्ही दोघेही रिक्शा चालवतो. आदल्या रात्री आम्ही एका ढाब्यावर जेवायला गेलो असता एक फिरोज नावाचा तरुण तेथे आला आणि त्याने चपाती मागितली. मुन्नाने एक चपाती त्याला दिली. त्याने आणखी एक चपाती मागितल्यावर मुन्ना त्याला ‘नाही’ म्हणाला. यावर फिरोजला राग आला आणि तो वाद घालू लागला. या वेळी फिरोजने मुन्नाच्या पोटात चाकू खुपला आणि पळून गेला. (भिखारी असणार्‍या धर्मांधाकडे खायला काही नव्हते; मात्र शस्त्र होते, हे लक्षात घ्या ! अशांच्या आक्रमणांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – संपादक)