हनुमानगड (राजस्थान) – येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या बकरी ईदच्या दिवशी करण्यात आलेल्या गोहत्येच्या विरोधात गेल्या ४ दिवसांपासून येथील चिडियागांधी भागात हिंदूंच्या संघटना आणि हिंदू यांच्याकडून आंदोलन करण्यात येत आहे. २७ जुलै या दिवशी पोलिसांनी त्यांना तेथून हाकलण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी ३५ जणांना कह्यात घेतले आहे. दगडफेकीत काही पोलीस घायाळ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
बकरीद पर गोहत्या के बाद धरना दे रहे थे हिन्दू, राजस्थान पुलिस ने 35 को हिरासत में लिया: महिलाओं को पीटने के भी आरोप#AdhirRanjanChowdhury #DraupadiMurmuhttps://t.co/lqMgBY3032
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 28, 2022
१. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, बकरी ईदच्या दिवशी गोहत्या झाली; मात्र प्रशासन ते नाकारत आहे. गोहत्येमधील मांस सापडले होते. ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवल्यावर ते गोमांस असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी फारुख, अनवर, अमीन खान आणि सिकंदर खान यांना अटक केली. तेव्हापासून येथे तणाव निर्माण झाला आहे.
२. २६ जुलै या दिवशी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना हटवले होते, तर काही जणांना अटक केली होती. त्याच्या दुसर्या दिवशी विरोध म्हणून मोठ्या संख्येने गावकरी गोळा झाले आणि आंदोलन करू लागले, तेव्हा पोलिसांनी त्यांना विरोध केल्यावर दगडफेक झाली. या वेळी लाठीमार पोलिसांनी केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यानंतर येथे संचारबंदी लागू करण्यात आली असून मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
संपादकीय भूमिकाराजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने तेथे गोहत्या न झाल्यासच नवल ! यास विरोध करणार्यांवर कारवाई होणे, यात आश्चर्य ते काय ? ‘काँग्रेसला निवडून देणार्या हिंदूंना ही शिक्षाच होय’, असे म्हटल्यास चुकीचे ते काय ? |