बांगलादेशात हिंदूंच्या लोकसंख्येच्या टक्केवारीत घट !

अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या इस्लामी देशांत हिंदूंची जी स्थिती झाली आहे, ती भविष्यात भारतात झाल्यास आश्‍चर्य वाटू नये. काश्मीरमध्ये आणि बंगालमधील काही जिल्ह्यांमध्ये हिंदूंनी हे अनुभवले आहे !

आगरा येथे संपूर्ण कुटुंबाला झोपेच्या गोळ्या खाऊ घालून मुलगी तिच्या मुसलमान प्रियकरासह फरार

सरकारने या घटनेची चौकशी करून सत्य जनतेपर्यंत आणावे आणि दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !

राष्ट्राच्या परमावधीच्या अधोगतीचे कारण

‘माणुसकी शिकवणारी साधना सोडून इतर सर्व विषय शिकवणार्‍या आधुनिक शिक्षणप्रणालीमुळे राष्ट्राची परमावधीची अधोगती झाली आहे.’

राजकोट (गुजरात) येथील ‘पुनरुत्थान विद्यापिठा’चे माजी संयोजक पराग बाबरिया यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

श्री. पंकज बाबरिया यांनीही कार्याविषयीची माहिती जिज्ञासेने जाणून घेतली. ‘समाजाने दिलेल्या अर्पणाचा आश्रमात चांगल्या प्रकारे विनियोग केला जातो, हे आश्रम पाहून लक्षात आले’.

सर्व संशयितांना एकदा प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित करण्यात यावे !  – अधिवक्ता समीर पटवर्धन

कॉ. पानसरे हत्या प्रकरणात सर्व आरोपी हे वेगवेगळ्या कारागृहात आहेत. कर्नाटक येथील कारागृहात असलेल्या आरोपींना भेटण्यासाठी ८०० किलोमीटर अंतर जावे लागते आणि इतके होऊनही भेटीसाठी केवळ १० मिनिटे मिळतात. तेथील संशयितांना माझ्याशी सविस्तर बोलायचे आहे.

देशविरोधी घटनांचा निषेध करत ठाणे, उल्हासनगर आणि मुलुंड येथे हिंदुत्वनिष्ठांची पदयात्रा !

दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या ठिकाणी पदयात्रा आल्यावर हनुमान चालिसा पठण आणि महाआरती करून पदयात्रेची सांगता करण्यात आली. या पदयात्रेत सर्व जाती-पंथाचे लोक, तसेच पक्ष आणि विविध संस्थांचे पदाधिकारी अन् कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शिर्डी येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ फेरीचे आयोजन !

‘साईबाबा संस्थान’चे श्री साईबाबा कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय शिर्डी अन् भारत सरकारचे सूचना आणि प्रसारण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आझादी का अमृत महोत्सव’ या अंतर्गत २५ जुलै या दिवशी ‘हर घर तिरंगा’ फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

मंत्रालयात कामासाठी येणार्‍या लोकांना सचिवांनी भेटले पाहिजे ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

लवकरच १०० दिवसांचा कार्यक्रम सिद्ध करण्यात येणार आहे. पूर्वी चालू असलेली लोकहिताची कामेही चालू ठेवण्यात येणार आहेत. प्रशासनावरील ताण न्यून व्हावा, यासाठी रिक्त पदांची भरती होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी !

केंद्र शासनाने १ जुलै २०२२ पासून ‘सिंगल यूज’ (एकदा वापरायच्या) प्लास्टिकवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने प्लास्टिक लेपीत (कोटिंग) आणि प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

बोरीवली (मुंबई) येथे काँग्रेसने रेल्वे रोखली

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी २७ जुलै या दिवशी बोरीवली स्थानकावर आंदोलन केले आणि सौराष्ट्र एक्सप्रेस रोखली.