अमेरिकेमध्ये डॉक्टरांच्या तुटवड्यामुळे नवे संकट !

वर्ष २०३३ पर्यंत अमेरिकेत ५४ सहस्र १०० ते १ लाख ३९ सहस्र डॉक्टरांचा तुटवडा भासू शकेल. हा तुटवडा प्राथमिक, तसेच गंभीर उपचार पद्धतींच्या विभागातही भासवू लागला आहे.

काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख यांच्याकडून १ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा ! – किरीट सोमय्या, भाजपचे नेते

शिंदे सरकार आल्यानंतर या संदर्भातील काही कागदपत्रे मिळाली, ती आधी मिळत नव्हती; कारण आधीचे सरकार घोटाळेबाजांना वाचवण्याचे काम करत होते.

युक्रेनहून आलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना सामावून घेता येणार नाही ! – केंद्र सरकार

युद्धामुळे युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे २० सहस्र भारतीय विद्यार्थी भारतात परतले आहेत. आम आदमी पक्षाचे नेते सुशील गुप्ता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून या विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवण्याची विनंती केली आहे.

कांगो देशात ‘संयुक्त राष्ट्र शांती सैन्या’तील २ भारतीय सैनिकांची हत्या !

सुंयक्त राष्ट्रांचे शांती सैन्य वर्ष १९९९ पासून तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नरत आहे. यामध्ये विविध देशांच्या २० सहस्र शांती सैनिकांचा समावेश असून त्यांतील ४ सहस्र सैनिक हे एकट्या भारताचे आहेत.

राजस्थानमध्ये केवळ ३ आठवड्यांत पडला ७० टक्के पाऊस !

देशातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. त्यात राजस्थान राज्यात गेल्या ३ आठवड्यांत हंगामातील ७० टक्के पाऊस पडला. जोधपूरमध्ये हंगामातील ८४ टक्के पाऊस हा केवळ २६ जुलै या एकाच दिवशी पडला.

लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या विरोधात विहिंप उत्तरप्रदेशात ५ लाख हिंदूंचे करणार संघटन !

विश्‍व हिंदु परिषदेकडून धर्मांतरावर आळा घालण्यासाठी घराघरांत जाऊन जागृती केली जाणार आहे. ‘काशी प्रांतातील सर्व १९ जिल्ह्यांत ५ लाख लोकांचे लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या विरोधात संघटन केले जाईल.

हिजाब परिधान करता येण्यासाठी कर्नाटकात चालू होणार मुसलमानांची खासगी महाविद्यालये !

गेल्या ७५ वर्षांत सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी मुसलमानांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लांगूलचालनाचे अनेकानेक प्रयत्न केले. तरी ‘एखाद्याचे शेपूट वाकडे, ते वाकडेच’ यातला हा प्रकार आहे, हेच यातून लक्षात येते !

देहलीतील विहिंपचे कार्यालय बाँबने उडवून देण्याची धमकी देणार्‍या प्रिंस पांडे या तरुणाला अटक !

हिंदु कुटुंबाने ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याच्या प्रकरणी संघाने काहीच न केल्याने  याकडे लक्ष वेधण्यासाठी धमकी दिल्याचा दावा !

सर्वोच्च न्यायालयाकडून अंमलबजावणी संचालनालयाचे अटकेचे अधिकार अबाधित !

‘प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अ‍ॅक्ट’ (पी.एम्.एल्.ए.) या कायद्याच्या अंतर्गत अटकेसाठी अंमलबजावणी संचालनालयाचे (‘ईडी’चे) अधिकार सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विनीत जिंदल यांचा शिरच्छेद करण्याची धमकी !

हिंदुत्वनिष्ठांना धमकी मिळाल्यावर पोलीस संबंधितांना संरक्षण पुरवतात. असे संरक्षण पुरवण्यासह धमकी देणार्‍यांवर वचक बसेल, अशी कारवाई केल्यास हिंदूंना धमकावण्याचेच काय, तर त्यांच्याकडे डोळे वर करून बघण्याचे धर्मांधांचे धाडस होणार नाही !