देहलीतील विहिंपचे कार्यालय बाँबने उडवून देण्याची धमकी देणार्‍या प्रिंस पांडे या तरुणाला अटक !

रा.स्व. संघाचा समर्थक असल्याचा तरुणाचा दावा !

प्रिंस पांडे

नवी देहली – येथील झंडेवालन मंदिराच्या दुसर्‍या मजल्यावर असलेले विश्‍व हिंदु परिषदेचे कार्यालय बाँबने उडवण्याची धमकी देणार्‍या प्रिंस पांडे या २६ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली. तो मध्यप्रदेशच्या भाटवाली गावातील निवासी आहे.

पांडे स्वतःला रा.स्व. संघाचा समर्थक म्हणवत आहे, असे पोलिसांनी सांगितले. त्याच्या चौकशीमध्ये त्याने, ‘माझ्या गावामध्ये एका हिंदु कुटुंबाने ख्रिस्ती धर्म स्वीकारला. या प्रकरणी कुणीच काही करत नसल्याने माझा राग अनावर झाला. संघाचे ज्येष्ठ अधिकारीही काही करत नसल्याने आणि सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी मी ही धमकी दिली’,  असे त्याने पोलिसांना सांगितले.

संपादकीय भूमिका

हिंदु कुटुंबाने ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याच्या प्रकरणी संघाने काहीच न केल्याने  याकडे लक्ष वेधण्यासाठी धमकी दिल्याचा दावा !