कन्हैयालाल यांच्या हत्येच्या निषेधार्थ उदयपूरमध्ये सहस्रो हिंदूंचा मोर्चा !

उदयपूर येथे कन्हैयालाल यांच्या झालेल्या क्रूर हत्येच्या विरोधात हिंदूंनी टाऊन हॉल ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर मोर्चा काढला. यात सहस्रो हिंदू सहभागी झाले होते. मोर्च्याच्या संपल्यानंतर काही तरुणांनी देहली गेट चौकात दगडफेक केली.

भारतात हिंदु आणि मुसलमान यांचा सभ्य समाज निर्माण करण्यासाठी पाकचे ४ तुकडे करा ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

असे ट्वीट भाजपचे वरिष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी कन्हैयालाल यांच्या हत्येच्या प्रकरणावरून केले आहे.

मणीपूर येथे भूस्खलन झाल्याने ५५ सैनिक मातीच्या ढिगार्‍याखाली दबले  

सातत्याने कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्यामुळे सैन्याचे ५५ सैनिक मातीमध्ये दबले गेले. यांतील ६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ही घटना राज्यातील तुपुल रेल्वे स्थानकाजवळ घडली.

हिंदूंना अशा नेत्याची आवश्यकता आहे, जो हिंदूंचे १०० टक्के रक्षण करील !

आता असहिष्णुतेच्या प्रती सहिष्णु होणे बंद केले पाहिजे. जिहादी, आतंकवादी आणि कट्टरतावादी यांच्यापासून हिंदुत्वाचे रक्षण करा. इस्लामचे लांगूलचालन करू नका, अन्यथा याचे मूल्य चुकवावे लागेल !

पुरी येथील जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेस १ जुलैपासून आरंभ !

पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ मंदिराची वार्षिक रथयात्रा १ जुलैपासून, म्हणजे आषाढ शुक्ल पक्ष द्वितीयेपासून आरंभ होणार आहे. जगन्नाथ पुरी मंदिर हे भारतातील प्राचीन आणि भारतातील पवित्र चारधाम मंदिरांपैकी एक आहे.

कन्हैयालाल यांच्या हत्येचे धागेदोरे इस्लामिक स्टेटशी !

इस्लामिक स्टेट ही जिहादी आतंकवादी संघटना करते तशा पद्धतीने राजस्थानच्या उदयपूर येथे कन्हैयालाल यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. यातील एक आरोपी रियाज अन्सारी याचे इस्लामिक स्टेटच्या ‘स्लिपर सेल’चा गट असलेल्या ‘अलसुफा’शी संबंध असल्याचे समोर आले आहे.

‘माणूस’ कुणाला म्हणता येईल ?

‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वैराचार हे एक वेळ प्राण्यांचे वैशिष्ट्य असू शकते, माणसाचे नव्हे. ‘धर्मबंधनात रहाणे, धर्मशास्त्रांचे अनुकरण करणे’, असे करणार्‍यांनाच ‘माणूस’ म्हणता येते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

एकनाथ शिंदे गटाकडून आसाम येथील पूरग्रस्तांना ५१ लाख रुपयांचे साहाय्य !

एकनाथ शिंदे यांनी आसाम येथील पूरग्रस्तांना शिवसेनेचे सर्व आमदार आणि सहयोगी आमदार यांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री साहाय्य निधीत ५१ लाख रुपयांचे साहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ट्वीट केले आहे.