भारतात हिंदु आणि मुसलमान यांचा सभ्य समाज निर्माण करण्यासाठी पाकचे ४ तुकडे करा ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

भाजपचे वरिष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

नवी देहली – भारतात सभ्य हिंदु आणि मुसलमान समाज निर्माण करण्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे पाकिस्तानचे ४ तुकडे करणे; मात्र असे करणे सध्याच्या व्यवस्थेत शक्य नाही; कारण दुबईवरून पैसा, चित्रपट आणि क्रिकेट यांना नियंत्रित केले जाते आणि भारतीय नेते या तिन्ही गोष्टींपासून दूर राहू शकत नाहीत, असे ट्वीट भाजपचे वरिष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी कन्हैयालाल यांच्या हत्येच्या प्रकरणावरून केले आहे.