बहुमत चाचणीत विजय आमचाच ! – एकनाथ शिंदे

आमच्याकडे ५० आमदार आहेत. कोणत्याही आमदारावर बळजोरी नसून बहुमत चाचणीत आमचाच विजय होईल, असा विश्वास आमदार एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला. गौहत्ती येथे श्री कामाख्यादेवीच्या दर्शनानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

लोणंद (जिल्हा सातारा) येथे विनाअनुमती उभारलेले पाळणे काढण्यास प्रारंभ !

याविषयी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक महसूल, पोलीस आणि नगरपंचायत अधिकारी यांना आदेश दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

अलमट्टी धरणातील पाणीसाठा १५ ऑगस्टपर्यंत नियंत्रित ठेवण्याचा निर्णय !

महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगाणा, मध्यप्रदेश आणि गुजरात या राज्यांच्या जलसंपदा, जलसंधारण विभागाचे सचिव, संबंधित राज्याच्या सीमेवरील जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता आदींसह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सोलापूर येथे प्राणीसंग्रहालयाचे संचालक पद मागील २ वर्षांपासून रिक्त !

केंद्रीय प्राणीसंग्रहालय संचालनालयाने दाखवलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी महापलिका प्रयत्नरत असली तरी संचालक पदासाठी प्रतिसाद न मिळाल्याने प्राणीसंग्रहालय चालू होण्यास विलंब लागत आहे

इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंत १०० टक्के अभ्यासक्रम पूर्ववत् शिकवला जाणार !

कोरोनाच्या संकटकाळात शिक्षण ऑनलाईन घेण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण न्यून व्हावा, यासाठी इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंत अभ्यासक्रम २५ टक्के न्यून करण्यात आला होता.

कोरोनाच्या काळात शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत पुन्हा आणण्यासाठी सरकार ‘झिरो ड्रॉपआऊट मिशन’ राबवणार !

मराठीच्या उपयोगासाठी विविध कार्यक्रम घोषित करणार्‍या सरकारने सर्व शासकीय उपक्रमांची नावे मराठीत ठेवून स्वत:पासून याचा प्रारंभ करावा !

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना पुन्हा जिवे मारण्याची धमकी !

पत्रात पेडणेकर यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे. तसेच बलात्कार करण्याचीही धमकी दिली आहे. या पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच महाविकास आघाडी सरकार पाडण्यास सांगितल्याचे लिहिले आहे.

बालकाच्या मृत्यूस उत्तरदायी अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा !

या प्रकरणी शहरातील जागृती नागरिक आणि ‘दक्ष कराडकर ग्रुप’च्या वतीने पालिका मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

पिंपरीत (पुणे) पाणी प्रश्नावरून हंडा मोर्चा !

जून महिना संपत आला, तरी राज्यासह पुण्यात पुरेसा पाऊस पडला नसल्यामुळे अनेक शहरांमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातच पुणे महापालिकेत अनेक गावांचा समावेशही झाला आहे.

एस्.टी.च्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ !

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रा असल्यामुळे यात्रेमध्ये ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये; म्हणून ही मुदतवाढ देण्यात आली आहे. १ सप्टेंबर २०२२ पासून स्मार्ट कार्ड बंधनकारक केले जाणार आहे.