‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग- २)’ या ग्रंथाचे प्रकाशन !

या प्रसंगी प.पू. भक्तराज महाराजांच्या पत्नी प.पू. जीजी, पुत्र पू. नंदूदादा कसरेकर आणि भक्त श्री. शशीकांत ठुसेकाका यांच्या हस्ते ‘प.पू भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग- २)’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

पुणे येथे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमामधील मारहाण प्रकरणात भाजपच्या ३ कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद !

शिवानंद द्विवेदी लिखित ‘अमित शहा आणि भाजपची वाटचाल’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या प्रमुख पाहुण्या म्हणून १६ मे या दिवशी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात आल्या होत्या. कार्यक्रमाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणा…

पंढरपूरच्या यात्रेसाठी २० लाख प्रवाशांचे उद्दिष्ट ठेवून ‘एस्.टी.’चे नियोजन चालू ! – विलास राठोड, विभाग नियंत्रक

गेली दोन वर्षे कोरोना संसर्गामुळे पंढरपूर येथील आषाढी यात्रा झाली नाही. यंदा मात्र राज्य परिवहन महामंडळ आषाढी यात्रेसाठी जय्यत सिद्धता करत असून २० लाख प्रवाशांचे उद्दिष्ट ठेवून नियोजन चालू केले आहे.

(म्हणे) ‘औरंगाबादच्या नामांतराचा विषय सरकारच्या अजेंड्यावर नाही; आमच्यासाठी पाणीप्रश्न महत्त्वाचा !’ – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याचा विषय महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर नाही. प्रत्येक पक्षाचे अजेंडे असतात. त्यावर माझे व्यक्तिगत मत देणे योग्य नाही; मात्र सरकारच्या अजेंड्यावर हा विषय नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीविषयी सर्वाेच्च न्यायालयाची महाराष्ट्र शासनाला विचारणा !

ज्या ठिकाणी अधिक पाऊस नसतो, त्या ठिकाणी निवडणुका घेण्यास काय हरकत आहे ? अशी विचारणा सर्वाेच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला केली आहे. याविषयी जिल्हानिहाय आढावा घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्याचे निर्देश न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला दिले आहेत.

क्षात्रतेज, भाव आणि चैतन्य यांचा अपूर्व संगम असलेली पुणे येथील भव्य ‘हिंदू एकता दिंडी’ !

धर्मप्रेमी, हितचिंतक आणि वाचक यांनी उत्स्फूर्तपणे केलेल्या पुष्पवृष्टीने संपूर्ण दिंडी निघाली न्हाऊन !

मनसेचे संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या जामिनावर १९ मेला निकाल !

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि मनसेचे पदाधिकारी संतोष धुरी यांच्या जामिनावरील मुंबई सत्र न्यायालयामधील सुनावणी १७ मे या दिवशी पूर्ण झाली. न्यायालयाने यावरील निर्णय राखून ठेवला असून १९ मे या दिवशी यावरील निर्णय देणार आहे.

‘ओआयसी’ आणि पाक !

इस्लामी देश अन्य कुठल्याही सूत्रांवरून विभागलेले असले, तरी धर्माच्या सूत्रावरून ते जागतिक स्तरावर एकत्रित येतात, हे यातून स्पष्ट होते. हे लक्षात घेऊन भारताने अंतर राखूनच इस्लामी राष्ट्रांशी संबंध प्रस्थापित करणे आवश्यक !

पुरातत्वीय उदासीनता !

ज्ञानवापी मशिदीच्या संदर्भातही पुरातत्व विभागाची भूमिका काय ? न्यायालयात सर्वेक्षणाची मागणी केल्यानंतर ते करण्यात आले. पुरातत्व विभागाने ते स्वतःहून का नाही केले ? ऐतिहासिक वारशांचे केवळ जतन करणे पुरेसे नसते, तर त्या वारशाशी निगडित दबलेला सत्य इतिहास समोर आणण्याचे कर्तव्यही पुरातत्व विभागाचे नाही का ? भारतात तर हे फार महत्त्वाचे आहे !

नीमच पाकिस्तानमध्ये आहे का ?

नीमच (मध्यप्रदेश) येथील जुनी कचेरी परिसरात १६ मेच्या रात्री धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केले. येथील दर्ग्याजवळ श्री हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यावरून त्यांनी आक्रमण केले.