मुंबई साखळी बाँबस्फोटातील ४ आरोपींना गुजरात येथे अटक !

गुजरातमधील आतंकवादविरोधी पथकाने वर्ष १९९३ मधील साखळी बाँबस्फोटातील ४ आरोपींना अटक केली आहे. आतंकवादविरोधी पथकाडून या आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे. हे वृत्त ‘ए.एन्.आय्.’ वृत्तसंस्थेकडून देण्यात आले आहे.

केवळ काशीच नव्हे, तर बळकावलेली ३६ सहस्र मंदिरे पुन्हा मिळवल्याविना हिंदू थांबणार नाहीत ! – सुरेश चव्हाणके, सुदर्शन न्यूज

आताही आपण मंदिरे उभी करत आहोत; पण मंदिरांच्या रक्षणासाठी आपण काय व्यवस्था उभी करणार आहोत ? याचा विचार हिंदूंनी करायला हवा. इतिहासात झालेल्या चुका पुन्हा होता कामा नयेत.

कोरोनाच्या काळात गंगानदीमध्ये किती मृतदेह पुरले किंवा आढळले ?, याची माहिती द्या !

राष्ट्रीय हरित लावादाने यावर्षी ३१ मार्चपर्यंत कोरोनाच्या काळात गंगानदीमध्ये तरंगणारे आणि नदीच्या काठावर पुरण्यात आलेल्या मानवी मृतदेहांच्या संख्येविषयी उत्तरप्रदेश आणि बिहार या दोन्ही राज्य सरकारांकडून माहिती मागवली आहे.

मुंबई येथे नौदलाच्या उदयगिरी आणि सुरत या युद्धनौकांचे जलावतरण !

भारतीय नौदलासाठी ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स’ या जहाजबांधणी कारखान्यात बांधण्यात आलेली विशाखापट्टणम् श्रेणीतील अखेरची विनाशिका ‘सुरत’ आणि निलगिरी श्रेणीतील फ्रिगेट्स ‘उदयगिरी’चे जलावतरण झाले.

लखनौ शहराचे नाव पालटण्याचे योगी आदित्यनाथ यांचे सुतोवाच !

केंद्र सरकारने मुसलमान आक्रमणकारी आणि ब्रिटीश यांनी विविध शहरांना दिलेली सर्व नावे पालटून क्रूरकर्म्यांच्या मानसिक गुलामगिरीपासून देशाला मुक्त करावे, असेच राष्ट्रप्रेमी जनतेला वाटते !

संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी बंद करावी ! – स्थानिकांची मागणी

छत्रपती संभाजीराजेंची हत्या करणाऱ्या, तसेच स्वतःच्या भावालाही जिवानिशी मारणाऱ्या अन् जनतेचा क्रूरपणे छळ करणाऱ्या औरंगजेबाच्या समोर कुणी नतमस्तक होऊच कसे शकते ?’, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

औरंगाबाद विमानतळाचे ‘छत्रपती संभाजी महाराज’ असे नामकरण करण्याची मागणी !

औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची १७ मे या दिवशी भेट घेतली.

संभाजीनगर येथील औरंगजेबाचे थडगे उद्ध्वस्त करण्याची मनसेची मागणी !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संभाजीनगर येथील औरंगजेबाचे थडगे उद्ध्वस्त करण्याची मागणी शिवसेनेकडे केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका जुन्या मुलाखतीचा संदर्भ देत ही मागणी करण्यात आली आहे.

नाशिक येथील ‘अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठा’त ५० कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप !

केंद्राचे धुळे येथील सेवेकरी अमर पाटील यांनी हा आरोप करत पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. श्री. अण्णासाहेब मोरे यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

सोलापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त अभिवादन !

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने जुना पुणे नाका भागातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. या वेळी विविध मंडळे, सामाजिक संघटना, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.