पोर्तुगिजांनी पाडलेल्या मंदिरांच्या पुनर्उभारणीचे काम करण्यात चूक काय ?

हिंदू कधीही दुसर्‍याची हत्या किंवा त्यांच्यावर आक्रमण करत नाहीत. हिंदूंचेच धर्मांतर केले जात आहे. हिंदूंच्या मंदिरांचे मोठ्या प्रमाणात भंजन करण्यात आले. भंजन झालेल्या मंदिरांची पुनर्उभारणी करत असल्यामुळे हिंदूंनाच दोषी ठरवले जात आहे.’’

पाश्‍चिमात्य शक्तींनी चुकीचा इतिहास आमच्यावर लादला ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

आमच्या इतिहासातील बहुतांश भाग हा पाश्‍चिमात्यांच्या प्रचाराचाच एक भाग आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या प्रकाराला आव्हान दिल्याने त्यांच्यावर क्रूरपणे अत्याचार करण्यात आले. त्यांच्या विरोधात खोटी माहिती प्रसारित करण्यात आली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘व्यवहारात अधिकाधिक कमावणे असते, तर साधनेत सर्वस्वाचा त्याग असतो; म्हणून व्यवहारातील माणसे दुःखी असतात, तर साधक आनंदी असतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

अवैधरित्या तिकीट विक्री करणाऱ्या दलालांविरुद्ध मध्य रेल्वेची कारवाई !

रेल्वेच्या तिकिटांची अवैधरित्या विक्री करणाऱ्या दलालांवर मध्य रेल्वेने कारवाई केली आहे. मध्य रेल्वेचे दलालविरोधी पथक आणि आर्.पी.एफ. यांच्या साहाय्याने वाणिज्य शाखेने ही मोहीम राबवली.

सनातन हिंदु धर्माच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक ! – आनंद जाखोटिया, मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

सरकारी अनुदानाने अल्पसंख्यांक त्यांच्या पंथाचे शिक्षण घेऊ शकतात; मात्र बहुसंख्य हिंदूंना ही सवलत नाही. हिंदूंच्या मंदिरांचे अधिग्रहण करण्यात येते; पण अन्य पंथियांच्या प्रार्थनास्थळांचे सरकारीकरण होत नाही. त्यामुळे हिदूंशी होणारा हा भेदभाव नष्ट करण्यासाठी आणि सनातन हिंदु धर्माच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्रच आवश्यक आहे

इंधन निर्यातीवर बंधने आल्याने जर्मनीत वाहनांवर वेगमर्यादा येणार !

अधिक वेगामुळे अधिक इंधन लागत असल्याने जर्मनीत वाहनांच्या वेगावर मर्यादा आणण्याचा निर्णय तेथील विविध राज्यांच्या पर्यावरण मंत्र्यांनी एकमुखाने घेतला. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जर्मनीला तेल आणि वायू मिळण्यावर बंधने आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्र्यांनी सांगितले.

काशी पीठाच्या ज्ञानसिंहासनावर उत्तराधिकारी म्हणून आणि ८७ वे जगद्गुरु म्हणून सोलापूरचे डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी आरुढ !

वाराणसी येथे काशी पीठाच्या जंगमवाडी मठात असलेल्या परंपरेच्या ठिकाणी अत्यंत भक्तीपूर्ण वातावरणात हा संपूर्ण सोहळा पार पडला. सोलापुरातून अनेक भाविक हा सोहळा पहाण्यासाठी उपस्थित होते.