काशी पीठाच्या ज्ञानसिंहासनावर उत्तराधिकारी म्हणून आणि ८७ वे जगद्गुरु म्हणून सोलापूरचे डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी आरुढ !

वाराणसी येथे काशी पीठाच्या जंगमवाडी मठात असलेल्या परंपरेच्या ठिकाणी अत्यंत भक्तीपूर्ण वातावरणात संपूर्ण सोहळा पार पडला

सोलापूर – पंच पीठांपैकी एक पीठ असलेल्या काशीपीठाच्या ज्ञानसिंहासनावर उत्तराधिकारी म्हणून आणि ८७ वे जगद्गुरु म्हणून सोलापूरचे डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी आरुढ झाले आहेत. वाराणसी येथे काशी पीठाच्या जंगमवाडी मठात असलेल्या परंपरेच्या ठिकाणी अत्यंत भक्तीपूर्ण वातावरणात हा संपूर्ण सोहळा पार पडला. सोलापुरातून अनेक भाविक हा सोहळा पहाण्यासाठी उपस्थित होते.

काशी पीठाचे विद्यमान जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी उत्तराधिकारी डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांना मंत्रोपदेश दिला. त्यानंतर चांदीचे कमंडलू, पिवळी पताका असलेला पीठाचे प्रतीक दंड प्रदान करण्यात आला. या वेळी नूतन जगद्गुरूंच्या मस्तकावर १ किलो वजन असलेले सोन्याचे किरीट ठेवून त्यांना जगद्गुरूचे अधिकार देण्यात आले. या पट्टाभिषेक सोहळ्यानंतर जंगमवाडी मठापासून ते दशाश्वमेध घाटापर्यंत अड्डपालखी काढण्यात आली. या सोहळ्यासाठी सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, यांसह अनेक जण उपस्थित होते.