लोकायुक्त कायद्यासाठी राज्यात पुन्हा मोठ्या जनआंदोलनाची आवश्यकता ! – अण्णा हजारे

देवेंद्र फडणवीस यांनी लोकायुक्त कायदा करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांनीही लोकायुक्त कायदा करण्याचे आश्वासन दिले; मात्र अडीच वर्षे उलटूनही त्यावर काहीच कारवाई झालेली नाही….

मान्सून ४८ घंट्यांत बंगालच्या उपसागरात येणार !

यंदा मान्सून ४ दिवस अगोदरच येणार आहे. सध्या अंदमान आणि निकोबार बेटांजवळ मान्सूनची प्रगती होत आहे. आगामी ४८ घंट्यांत मान्सून बंगालच्या उपसागरात येण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

शिवसेनेने संभाजीनगर नावाचा ठराव मांडल्यास संमतीसाठी प्रयत्न करू ! – भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री

शिवसेनेने विधानसभेत औरंगाबादऐवजी ‘संभाजीनगर’ नावाचा ठराव घ्यावा आणि केंद्र सरकारकडून हा प्रस्ताव संमत होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी १४ मे या दिवशी येथे केले.

हिंदूंनो, जिवंत रहाण्यासाठी लढायला आणि आत्मरक्षण करायला शिका ! – टी. राजासिंह, भाजप आमदार, तेलंगाणा

भारत हे ‘सेक्युलर’ (निधर्मी) राष्ट्र असल्यामुळेच भाग्यनगर (हैद्राबाद) येथील नागराजू या हिंदु युवकाची दिवसाढवळ्या हत्या झाली. जोपर्यंत भारत अखंड ‘हिंदु राष्ट्र’ होत नाही, तोपर्यंत हिंदू अशाच प्रकारे मारले जातील. नागराजूची हत्या करणारे धर्मांध असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही.

‘क्रोएशिया’ युरो स्वीकारणारा २० वा देश बनणार !

क्रोएशियन संसदेने १ जानेवारी २०२३ पासून त्यांच्या देशात ‘युरो’ हे चलन स्वीकारणार असल्याचा कायदा संमत केला आहे. यामुळे क्रोएशिया हा युरो चलन स्वीकारणारा युरोप खंडेतील २० वा देश बनणार आहे.

अनिल देशमुख यांच्याविषयी मी बोलणारच, फार तर धाड पडेल ! – सौ. सुप्रिया सुळे, खासदार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या कारागृहात आहेत. १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात त्यांना जामीन मिळालेला नाही.

राज्यात शिष्यवृत्तीचे ६६ सहस्र अर्ज प्रलंबित

महाविद्यालयांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज वेळेत सादर न केल्यास महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येईल, असे संकेत समाजकल्याण विभागाने १४ मे या दिवशी दिले आहेत.

नाशिक येथे ‘हिंदू एकता दिंडी’च्या माध्यमातून धर्माभिमान्यांकडून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी नमन !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने नाशिक येथे १५ मे या दिवशी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. दिंडीच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग चेतवले गेले.

संकटकाळात स्वत:चे रक्षण करण्यासाठी साधना अपरिहार्य ! – सनातनचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर

सध्या कोरोनातून दिलासा मिळाला असला, तरी त्यातून पूर्ण सुटका झालेली नाही. जगात युद्धजन्य परिस्थिती आहे. शेजारी राष्ट्रांमध्ये अराजक माजले आहे. हिंदु धर्मावर सतत आक्रमणे होत आहेत. त्यामुळे समाजजीवन अस्थिर झाले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात संस्कृतच्या वर्गाचे आयोजन !

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने प्राथमिक स्तरावरील संस्कृत अभ्यासक्रमाचे वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये लिहिणे, वाचणे आणि बोलणे अशा प्रकारे संस्कृत भाषा शिकवण्यात येईल.