‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेसाठी मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात भाविक आणि हिंदुत्वनिष्ठ यांचे साकडे !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्त हिंदु राष्ट्र जागृती अभियान !

मुंबईमध्ये रेल्वे, मेट्रो आणि बेस्ट यांतून प्रवास करण्यासाठी एकच ‘कार्ड’ !

यापुढे मुंबईमध्ये रेल्वे, मेट्रो आणि बेस्ट यांसाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड’ या एकाच ‘कार्ड’द्वारे प्रवास करता येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २५ एप्रिल या दिवशी ‘एक शहर, एक कार्ड’ या योजनेच्या अंतर्गत या ‘कार्ड’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

राणा दांपत्याची गुन्हा रहित करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली !

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांची पोलिसांनी नोंद केलेला गुन्हा रहित करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

शासनाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात प्रविष्ट

प्रतापसिंह राणे यांना मंत्रीपदाचा दर्जा दिल्यास त्यांच्या दिमतीला १२ कर्मचारी द्यावे लागणार असून त्यांच्यावर प्रतिवर्ष ९० लाख रुपयांचा आर्थिक बोजा सरकारी तिजोरीवर पडणार असल्याचा याचिकाकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांचा दावा आहे.

अधिकार नसलेल्या गृहमंत्र्यांच्या बैठकीला जाऊन काय लाभ ? – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

राज्यात भाजपच्या नेत्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. पोलिसांचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणात चालला आहे. भाजपच्या नेत्यांवर खोटे गुन्हे नोंदवण्यात येत आहेत. विरोधी पक्षाला संपवण्याचे काम चालू आहे.

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि सचिन अंदुरे यांची निर्दाेष मुक्तता करावी, यासाठी प्रविष्ट केलेले आवेदन न्यायालयाने फेटाळले !

कॉ. गोविंद पानसरे प्रकरणात  नेमके हल्लेखोर कोण ? हेच निश्चित नसल्याने कॉ. पानसरे हत्या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि सचिन अंदुरे यांची निर्दाेष मुक्तता करावी, असा युक्तिवाद अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केला होता.

श्रीरामपूर (नगर) येथे भेळ विक्रेत्याला धर्मांधाची धमकी !

येथे ‘हम पुरी तैयारी में है ।’ असे म्हणत अकिल सुन्नाभाई याने गोंधवणी रस्ता परिसरात भेळ विक्रेत्याला धमकी देण्याचा प्रकार २२ एप्रिलच्या रात्री १० वाजता घडला आहे.

विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून सर्व दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी !

शिवछत्रपतींचा अमूल्य ठेवा असलेला विशाळगड राज्याचा पुरातत्व विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आज दुरवस्थेत आहे.

जैव वैद्यकीय कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी कार्यरत कोल्हापूर येथील समितीची १ वर्ष १० मासांत केवळ एकच बैठक !

आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार करून राज्यातील निष्क्रीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांची मागणी !

राजकारण्यांचा ‘धंदा’ !

भुजबळांनी कोट्यवधी रुपयांची संपत्ती कोणत्या धंद्याद्वारे मिळवली, हे सर्वसामान्य जनतेला ठाऊक नाही’, असे कसे म्हणणार ? ‘राजकारण्यांकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती कोणत्या धंद्यातून त्यांना मिळते ?’ जनतेला याचे उत्तरही ठाऊक आहे; मात्र जनता ते सिद्ध करून दाखवू शकत नाही, असा ‘प्रामाणिक धंदा’ हे राजकारणी करत आहेत !