उद्दाम धर्मांध !
श्रीरामपूर (जिल्हा नगर) – येथे ‘हम पुरी तैयारी में है ।’ असे म्हणत अकिल सुन्नाभाई याने गोंधवणी रस्ता परिसरात भेळ विक्रेत्याला धमकी देण्याचा प्रकार २२ एप्रिलच्या रात्री १० वाजता घडला आहे. या प्रकरणी नितीन लांबोळे या तरुणाने श्रीरामपूर शहर पोलिसात तक्रार दिल्यावरून आरोपी अकिल सुन्नाभाई याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ‘हम पुरी तैयारी में है ।’ हा काय प्रकार आहे, याचे अन्वेषण पोलीस करत आहे.
नितीन लांबोळे यांनी सांगितले की, गोंधवणी रस्ता येथे मोठा भाऊ नीलेश लांबोळे हा ‘विजय फरसाण’ या दुकानात असतांना आरोपी अकिल पत्नीसह दुकानात आला. त्याने १०० रुपयांची भेळ घेतली आणि २ किलो रद्दी मागितली. तेव्हा ‘रद्दी शिल्लक नाही’, असे सांगितले असता ‘दंगल होने दो, हम पुरी तैयारी में है ।’, असे म्हणत अकिल दमदाटी करत निघून गेला.