मिटकरी यांच्यात अजानची टिंगल करण्याचे धारिष्ट्य आहे का ? – सुनील घनवट, संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, कुणीही उठावे आणि हिंदु धर्मातील धार्मिक विधींची थट्टा करावी, हे आता सहन केले जाणार नाही. या विरोधात वैध मार्गाने आंदोलन करण्यात येईल.

गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी पुण्यात राष्ट्रवादीकडून पोलिसात तक्रार !

यावर सदावर्ते यांनी सांगितले की, माझी आक्षेपार्ह वक्तव्ये म्हणजे माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आहेत. त्यांच्याकडे व्हिडिओ आहेत. ते पाहू शकतात. ते दंगे होतील असे कारण देत आहेत. मग ते आतापर्यंत का झाले नाहीत ? असा प्रश्न त्यांनी या वेळी उपस्थित केला.

गोव्यात मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा द्या !

उदगीर येथील मराठी साहित्य संमेलनात अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी ‘गोव्यात मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा द्यावा’, अशी जोरदार मागणी त्यांच्या भाषणात केली.

राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ब्राह्मणविरोधी ! – नितेश राणे, आमदार, भाजप

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हे मानधन घेऊन व्याख्यान देतात. ब्राह्मणांविषयी ते जे बोलले, ही त्यांची भूमिका होती कि अन्य कुणी त्यांना बोलायला लावले ? अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

सिंधुदुर्ग जिल्हा ब्राह्मण समाजाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांचा निषेध

आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाज, तसेच हिंदु धर्मातील धार्मिक संस्कार यांविषयी बेताल वक्तव्य केली आहेत. त्यामुळे आम्ही आमदार मिटकरी यांचा तीव्र निषेध करत असून त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा नोंद करावा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा ब्राह्मण समाजाच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मिटकरी यांच्यावर तात्काळ गुन्हा प्रविष्ट करावा ! – पुणे येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या विधानामुळे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत.

पेरू देशाचे स्वागतार्ह पाऊल !

पेरू देशात ४८ वर्षीय व्यक्तीने ३ वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याची घटना नुकतीच घडली. तेथेही ‘अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी’, अशी मागणी करण्यात आली. यानंतर अल्पावधीतच सरकारने धाडसी पाऊल उचलले.

अशांकडून हिंदूंनी दागिन्यांची खरेदी का करावी ?

एम्.पी. अहमद यांच्या मालकीचे ‘मलबार गोल्ड अँड डायमंड्स’ या आस्थापनेच्या अक्षय्य तृतीयेच्या प्रीत्यर्थ विज्ञापनात अभिनेत्री करीना कपूर खान यांच्या कपाळावर टिकली नाही. यामुळे या विज्ञापनाचा हिंदूंकडून विरोध होत आहे.

युद्धांचे अन्य परिणाम !

शहरे बेचिराख होतात. त्यामुळे उद्ध्वस्त शहरे, मार्ग, पूल आदी तसेच बुडालेली आस्थापने यांना उभारण्यात मोठा कालावधी गेल्याने विकास खुंटतो.