१. मोठ्या प्रमाणात जनतेचे होणारे स्थलांतर आणि पर्यायाने त्याचे अनेकविध दुष्परिणाम तिला भोगावे लागतात. देश सोडून गेलेल्या नागरिकांकडे त्यांची अत्यावश्यक कागदपत्रे, दुसऱ्या देशाचे नागरिकत्व आदी गोष्टी असतातच असे नाही. सर्व काही सोडून आल्याने नागरिकांना नव्याने आरंभ करून संसार उभा करावा लागतो. पैसे, कागदपत्रे, घर, नोकरी आदी नसल्याने काहींना अत्यंत हालाखीचे जिणे वर्षानुवर्षे किंवा आयुष्यभर जगावे लागते.
२. शत्रूने विद्यापिठे, ग्रंथालये आणि मंदिरे आदींवर आक्रमण केल्याने संस्कृतीवर मोठा आघात होतो, उदा. मोगलांच्या आक्रमणात भारतातील नालंदा आणि तशक्षिला विद्यापिठे भस्मसात झाली.
३. शहरे बेचिराख होतात. त्यामुळे उद्ध्वस्त शहरे, मार्ग, पूल आदी तसेच बुडालेली आस्थापने यांना उभारण्यात मोठा कालावधी गेल्याने विकास खुंटतो.
४. देशात बेरोजगारी, गरिबी असे असंख्य प्रकारचे आर्थिक प्रश्न निर्माण होतात.
५. शेती, अन्नधान्य, व्यवसाय या सर्वांवर परिणाम झाल्याने, तसेच देशाचा पैसा युद्धासाठी खर्च झाल्याने देशाची आर्थिक स्थितीही कोलमडते.
६. सर्वत्र मोठ्या प्रमाणात अस्थिरता निर्माण झाल्याने जीवनमान सुरळीत करणे याला प्राधान्य द्यावे लागते. त्यामुळे या काळात कला आणि संस्कृती विकसित होत नाही.
७. कुटुंबे उद्ध्वस्त झाल्याने अनाथ मुले, तसेच अत्याचार झाल्याने निर्माण झालेली अनौरस मुले आदींचा प्रश्न निर्माण होतो.
८. विदेशी फौजांतील सैनिकांकडून स्थानिक स्त्रियांवर अत्याचार केले जातात. स्त्रियांचे अपहरण किंवा विक्री असे प्रकारही ज्येत्यांकडून होतात.
९. जिंकलेली राजवट स्थानिक प्रजेला न्यून लेखून तिच्यावर वर्चस्व गाजवते. त्यामुळे सामाजिक अशांतता निर्माण होते.
– सौ. रूपाली वर्तक, सनातन आश्रम, पनवेल. (२१.४.२०२२)