मानखुर्द (मुंबई) येथे ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणाऱ्या हिंदूंवर धर्मांधांकडून तलवारी-काठ्या यांनी आक्रमण !
हिंदूंच्याच सण-उत्सवांच्या वेळी धर्मांधांकडून हिंदूंवर मोठ्या प्रमाणात आक्रमण केले जाते, यावरून हे पूर्वनियोजित षड्यंत्र नसेल कशावरून ?
उत्तराखंडच्या रुद्रनाथ मंदिरात तोडफोड !
उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण होण्याच्या घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने विशेषतः हिमालयात असणाऱ्या अशा मंदिरांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे !
हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येच्या फलकावरून पोलिसांनी मुंबईतील श्रीरामनवमीची शोभायात्रा रोखून धरली !
‘धार्मिक दंगली होतील’ म्हणून शिवछत्रपतींचा अफझलखानवधाचा पराक्रम महाराष्ट्रात झाकतात. उच्च न्यायालयाच्या मशिदींवरील भोंगे हटवण्याच्या आदेशाची कारवाई करण्यासही न धजावणाऱ्या पोलीसांकडून आणखी कोणती अपेक्षा करणार ?
वायूप्रदूषणामुळे प्रत्येक मिनिटाला जगातील १३ लोक पडतात मृत्यूमुखी !
विज्ञान हे मनुष्याला साहाय्यकारी ठरण्याऐवजी विनाशकारीच ठरत आहे, असेच या आकडेवारीतून सिद्ध होते ! सनातन धर्माचे अधिष्ठान घेऊन भौतिक प्रगती साधणे, हाच या भयावह जागतिक समस्येवरील एकमेव उपाय असल्याचे जाणा !
‘एम्.आय.एम्.’ पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष महंमद रुवेद यांची हिंदु धर्म स्वीकारण्याची चेतावणी
हिंदु धर्माची महानता जाणून नव्हे, तर स्वतः समस्यांनी ग्रस्त असल्यामुळे आणि त्याच्या निवारणासाठी स्वतःच्या समाजाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे स्वार्थापोटी हिंदु धर्म स्वीकारून रुवेद यांना काय साध्य होणार ? भावनेपोटी हिंदु धर्म स्वीकारण्याची भाषा करणाऱ्यांपासून हिंदूंनी लांब राहिलेलेच इष्ट !
श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर आक्रमण करणारे मूर्तीभंजक मोगलांचेच वंशज ! – हिंदु जनजागृती समिती
हिंदूंच्या संयमाचा अंत कुणी पाहू नये. श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर आक्रमण करणारे मूर्तीभंजक मोगलांचेच वंशज असून या प्रकरणी या प्रकरणांतील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.
पानवळ, बांदा येथील श्रीराम पंचायतन मंदिरात श्रीरामनवमी उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !
प.पू. दास महाराज, पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक आणि सनातनचे धर्मप्रसारक सद्गुरु सत्यवान कदम या संतत्रयींच्या उपस्थितीत पानवळ (डेगवे), बांदा येथील श्रीराम पंचायतन मंदिरात श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यात आला.
(म्हणे) ‘धर्मसंस्थेची कठोर चिकित्सा आवश्यक !’ – डॉ. शरद बाविस्कर, प्राध्यापक, जे.एन्.यू.
धर्मसंस्थेच्या चिकित्सेची भाषा करणाऱ्यांनी प्रथम धर्माचा अभ्यास म्हणजे साधना केली आहे का ? अभ्यास न करता धर्माच्या चिकित्सेची भाषा करणे हा प्रसिद्धीसाठी केलेला प्रयत्नच म्हणावा लागेल !
युवा पिढीचे विविध षड्यंत्रांपासून रक्षण करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य ! – अतुल अर्वेन्ला, हिंदु जनजागृती समिती
आपली युवा पिढी भरकटत आहे. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, जिजामाता, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जाज्वल्य इतिहासाची पुन्हा आठवण करून दिल्यास ते सन्मार्गावर येतील.